sawada

सावद्यात बाळासाहेब ठाकरे जयंती निम्मित शिवसेनेचा अनोखा कार्यक्रम – पालिका रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

सावद्यात बाळासाहेब ठाकरे जयंती निम्मित शिवसेनेचा अनोखा कार्यक्रम – पालिका रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्त पालिका रोजंदारी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा शिवसेना तर्फे सत्कार

सावदा, प्रतिनिधी युसूफ शाह

|सावदा :-जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे हिंदुहृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त पालिका पाणीपुरवठा कर्मचारी यांचाशिवसेने तर्फे सत्कार करण्यात आला.
येथील विश्राम गृह येथील प्रांगणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन शिवसेना शहर प्रमुख भरत नेहते यांचे हस्ते तालुका उपप्रमुख धनंजय चौधरी,शामकांत पाटील ,मिलींद पाटील ,शरद भारंबे ,प्रमोद भंगाळे, अतुल नेहते यांचे उपस्थिती रविवार संध्याकाळी साडे सहा वाजता करण्यात आले.
यावेळी शहरात पाणीपुरवठा करणारी मांगलवाडी येथील तापी पात्रातून आलेली पाईप लाईन रेल्वे च्या लहान पुला खाली फुटली तिची दुरुस्ती कठीण जागा असून लवकरात लवकर शहरास पसनी पुरवठा करणारी पाईप लाईन दुरुस्त करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करून शहर वासीयांची तहान भागवली त्या बद्दल ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करून त्यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी रोजनदारी कर्मचारी सचिन बोडे,विकास भंगाळे,धनंजय पाटील,सुरेश चौधरी,अशोक कुऱ्हाडे आणि प्रल्हाद कुऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला.
शहर प्रमुख भरत नेहेते,तालुका उपप्रमुख धनंजय (लाला चौधरी)
मिलिंद पाटील , संघटक शरद भारंबे,माजी नगरसेवक शामकांत पाटील , युवा सेना प्रमुख मनीष भंगाळे,नितीन महाजन,सुनील राणे,दूध डेअरी संचालक प्रमोद भंगाळे,अतुल नेहते,गणेश माळी,चंद्रकांत पाटील,शब्बीर खा अय्युब खां, हुसेन खा अय्युब खा उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button