इंदापूर

उजनी बॅकवाॅटरचा पर्यटन विकास करणार. खासदार. सुप्रिया सुळे

उजनी बॅकवाॅटरचा पर्यटन विकास करणार.
खासदार. सुप्रिया सुळे

इंदापूर दत्ताजी पारेकर

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा सुप्रियाताई सुळे आज उजनी बॅकवाॅटर परिसरातील गंगावळण ता इंदापूर येथे पाहणी करण्यासाठी आल्या. सुप्रियाताई उजनी बॅकवाॅटर परिसरातील पर्यटनासाठी प्रोच्छाहन देउन पुढाकार घेत आहात त्याबद्दल आपले कोकरे आयलॅन्ड कुगाव च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन. उजनी बॅकवाॅटर परिसरातील गंगावळण ता इंदापूर ते कोकरे आयलॅन्ड कुगाव चा भाग पर्यटनासाठी नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध आहे. उजनी बॅकवाॅटर परिसरात जल पर्यटन, नौका विहार, पक्षी निरीक्षण व कृषी पर्यटनाला चांगली संधी असून गंगावळण येथील मा महारूद्र पाटील व कुगाव येथील कोकरे आयलॅन्ड चे संस्थापक मा धुळाभाऊ कोकरे यांनी पुढाकार घेतला आहे. आज गंगावळण ते कोकरे आयलॅन्ड कुगाव परिसरात सुप्रियाताई सुळे यांचे जलपर्यटन केले. जैव विविधतेने नटलेल्या परिसरातील पर्यटनाचा आनंद घेतला.

Leave a Reply

Back to top button