Jalgaon

?जळगांव Live…जळगाव शहरातील पांडे पंचमुखी हनुमान मंदीर परिसरातून पंधरा लाख रुपये असलेली बॅग पिस्टलचा धाक दाखवत हिसकावून फरार होणारे दोघे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

? जळगांव Live…जळगाव शहरातील पांडे पंचमुखी हनुमान मंदीर परिसरातून पंधरा लाख रुपये असलेली बॅग पिस्टलचा धाक दाखवत हिसकावून फरार होणारे दोघे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : गेल्या 1 मार्च रोजी जळगाव शहरातील पांडे पंचमुखी हनुमान मंदीर परिसरातून पंधरा लाख रुपये असलेली बॅग पिस्टलचा धाक दाखवत हिसकावून फरार होणारे दोघे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना उल्हासनगर येथून ताब्यात घेत अटक करण्यात यश आले आहे. मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ (रा.मोहाडी ता.जि.धुळे) व रितीक ऊर्फ दादु राजेंद्र राजपुत (रा.पवननगर, चाळीसगाव रोड पश्चिम हुडको, धुळे जि.धुळे) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आज जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंधरा लाख रुपयांपैकी नऊ लाख दहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून उर्वरीत रकमेचा तपास सुरु आहे.

मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळ महेश महेश चंद्रमोहन भावसार हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलसह पंधरा लाख रुपये असलेली बॅग घेवून जात होते. त्यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांना ताब्यातील बॅग हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना काही जणांनी हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्टलचा धाक दाखवून त्यांनी मोटारसायकल तेथेच सोडून हिसकावलेली बॅग घेत पलायन केले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न.124/21 भा.द.वि. 397, 34 तसेच आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान चोरटे सोडून गेलेल्या मोटारसायकलच्या आधारे दोघा चोरट्यांची नावे निष्पन्न करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकासह एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. हेमंत कडसकर, पो. कॉ. इम्रान सैय्यद, पो.कॉ. सुधीर साळवे आदींचे दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. आरोपींच्या शोधार्थ धुळे, सुरत, पुणे व उल्हासनगर आदी ठिकाणी तपास पथक रवाना करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विजय पाटील, पो.हे.कॉ. नरेंद्र वारुळे यांनी वेळोवेळी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे दिलेल्या माहितीच्य आधारे धुळे, सुरत व उल्हासनगर आदी भागात दोघा चोरट्यांचा शोध घेण्यात आला. दरवेळी दोघे आरोपी पोलिस पथकाला गुंगारा देण्यात यशस्वी होत गेले. मात्र धुळे, सुरत नंतर अखेर उल्हासनगर येथे दोघांना पकडण्यात पोलिस पथकाला अखेर यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स.पो.नि. स्वप्नील नाईक, पो.हे.कॉ. रवि पंढरीनाथ नरवाडे, पो.हे. कॉ. संजय नारायण हिवरकर, पो. हे. कॉ. राजेश बाबाराव मेंढे, पो. ना. संतोष रामास्वामी मायकल, चा. पो. ना. भारत शांताराम पाटील यांना आरोपी मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ (22) रा.मोहाडी ता.जि.धुळे व रितीक ऊर्फ दादु राजेंद्र राजपुत (19) रा.पवननगर, चाळीसगाव रोड पश्चिम हुडको, धुळे जि.धुळे हे दोघे जण उल्हासनगर नं. 1 झुलेला मंदिरा जवळ असल्याची माहिती मिळाली. दोघांना तेथून ताब्यात घेत अटक करण्यात आली.

त्यांच्या ताब्यातून बॅगेतील 9 लाख 10 हजार रुपये हस्तगत करण्यात आले. उर्वरीत रकमेचा तपशील तपासात निष्पन्न होणार आहे. रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेली पिस्टल देखील हस्तगत करण्यात आली आहे. ताब्यातील आरोपी मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ यांचे विरुध्द धुळे व नाशिक येथे खुनाचा एक व जबरी चोरीचे सहा असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button