sawada

वाहनात गोवंश असल्याचा संशयावरुन दोघांना मारहाण:सावदा शहराची शांततेला गालबोट?

वाहनात गोवंश असल्याचा संशयावरुन दोघांना मारहाण:सावदा शहराची शांततेला गालबोट?

———————————————————
“पोलीसांना खबर न देता परस्पर कायदा हातात घेऊन वाहनात गोवंश असल्याचा संशय घेऊन अशा प्रकारे टवाळखोरांची मंडळी सामूहिक रित्या वाहनास अडवून किंवा मोटरसायकलद्वारे त्याचा पाठलाग करून वाहनची तोडफोड व त्यातील चालक,क्लीनर यांच्यावर प्राण घातक हल्ले,अशा घटनांमुळे शहराची शांतता व सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होवू नये, यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.”
———————————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनात गोवंश असल्याचा संशयावरुन कोणतीस चौकशी न करता तसेच याची खबर पोलिसांना न देता थेट काही टवाळखोरांनी कायदा हातात घेऊन वाहन चालक व क्लिनर यांना जबर मारहाण करून वाहनाची तोडफोड व काचे फोडल्याची गंभीर घटना सावदा येथे रावेर रोडावरील एचपी पेट्रोल पंपाच्या आवारात दि.३१ जुलै रोजी रात्री ८-३० वाजेच्या दरम्यान घडलेली असून,यामुळे शहराची शांततेला धोका निर्माण झाला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेशच्या खरगोन या गावातून गडी क्र.एमपी ४६ जी २८५८ ही बेकरीचे साहित्य वाहतूक करीत असताना महाराष्ट्रातील पाल मार्ग सावदा कडे येताना कोचूर गावातील या वाहनास मुलांच्या तोडक्याने अडवून चौकशी केली असता कोणत्याच प्रकारचा संशयस्पद प्रकार आढळून आला नसल्याने या वाहन सोडून दिले.परंतु काही टवाळखोर मुलांनी पुनश्च गाडीचा मोटरसायकल द्वारे पाठलाग करीत असताना सदरील गाडी चालकांनी रावेर रस्त्यावरील सावदा येथे पेट्रोल पंपात गाडी सहाऱ्यासाठी उभी केली असता पाठलाग करणाऱ्यांनी त्या वाहनातील क्लिनर इर्शाद खान व चालक आशिक खान या दोघांना जबर मारहाण केली.यामुळे सावदा शहरात एकच गोंधळ उडाला.तरी अशा बाहेरील टवाळखोर लोकांमुळे व संशयस्पद वाहनांमुळे सावदा शहराची शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असता.परंतु पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. सदरील घटनेची फिर्याद वाहनाचे क्लिनर इर्शाद नौशाद खान रा. खरगोन मध्य प्रदेश यांनी दिल्यावरून सावदा पोलीस ठाण्यात गुरनं.१८२/२०२३ भादवीचे कलम ३२४,३२३,३३७,१४३,१४७,१४८,१४९,४२७,५०४, मुंबई पो. अधि.१९५१ चे कलम ३७(१)(३),१३५ अन्वे महेंद्र पाटील,निशांत पाटील,कन्हैया पाटील,पवन सुतार,अविनाश कोळी,मनीष ठाकूर,गौरव पाटील सर्व रा.कोचुर ता.रावेर व इतर पाच ते सात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास एपीआय जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक विनोद खांडबहाले,पो.कॉ.युसुफ तडवी हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button