Amarawati

शासनाने विद्यार्थ्यांची परिक्षा फि परत करुन संपुर्ण शैक्षणिक फी माफ करावी पंकज हिरुळकर-

शासनाने विद्यार्थ्यांची परिक्षा फि परत करुन संपुर्ण शैक्षणिक फी माफ करावी
पंकज हिरुळकर-

सध्या संपुर्ण जगात व आपल्या देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात कोरोना संसर्ग विषाणुने थैमान घातले आहे.
या महामारीमुळे सर्वत्र अतिगंभीर परिस्थिति निर्माण झालेली आहे.
त्याच पार्श्वभुमीवर देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात 23 मार्च पासुन लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे.

त्या अंतर्गत खबरदारी मणुन 15 मार्च पासुन राज्यभरातील सर्वच महाविद्यालये, अनुदानीत व विनाअनुदानीत शाळा बंद करण्यात आल्या.
तसेच गंभिर परिस्थिति पाहता सर्व महाविद्यालयीन व शालेय परिक्षाही शासना मार्फत रद्द करण्यात आल्या आहेत.
परंतु राज्यावर अचानक संकट आल्यामुळे संचार बंदी लागु करण्यात आल्याने सर्व उद्योगधंदे, शेती व्यवसाय, व शेतकरी मजुर, नोकरदार, व हातमजुरी करणा-या अशा सर्चव वर्गांना याचा चांगलाच आर्थिक फटका बसला असुन पालकांवर व विद्यार्थांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अनेक पालकांचे रोजगार गेले आहेत.
खाजगी नोकरदारांना या बंद काळात मालक पगार देतील की नाही ही सुद्धा शंका आहे.
या सर्व गोष्टिचा विचार करता बंद काळात घर चालवितांना लागनारी कसरत पाहता
पालकांनी पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सर्व परिस्थितिचा विचार करता,
शासनाने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे चालु आगामी वर्षाचे शैक्षणीक शुल्क माफ करुन..
तसेच शासनाने रद्द केलेल्या परिक्षांची फी त्वरित विद्यार्थांना परत करुन एकप्रकारची त्यांना मदत करावी असी मागणी..
समस्त विद्यार्थांच्या वतिने..
पंकज हिरुळकर यांनी
मेल द्वारे
राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे,

महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षन मंत्री
श्री.उदयजी सामंत

महाराष्ट्र शालेय शिक्षन विभाग मंत्री
श्रीमती वर्षा गायकवाड़

राज्यमंत्री
श्री.बच्चुभाऊ कडु
यांना केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button