Ahamdanagar

आईच्या निधनाची वार्ता समजताच मुलानेही प्राण सोडले?अहमदनगर जिल्ह्यातील चांदा येथील घटना

आईच्या निधनाची वार्ता समजताच मुलानेही प्राण सोडले?अहमदनगर जिल्ह्यातील चांदा येथील घटना

सुनिल नजन अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा येथे समाज मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.चांदा येथील यशोदाबाई भानुदास दहातोंडे यांचे वयाच्या पासष्टाव्या वर्षी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने चौदा एप्रिल रोजी दुखःद निधन झाले. त्यांचा मुलगा शिवाजी भानुदास दहातोंडे वय (५५)यांच्या कानी ही आईच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी अतिशय शोक व्यक्त केला. आईच्या निधनामुळे शिवाजी रावांना अतिशय दुःख झाले. ते पोरके झाले. लहानपणापासून आईच्या कुशीत वाढलेल्या शिवाजी रावांना आईच्या शिवाय जगणे ही गोष्ट सहन झाली नाही.” उन्हाच्या भर दुपारी, फिरतो मी दारोदारी,स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” या पंक्ती प्रमाणे शिवाजी रावांना आईशिवाय जिवनजगणे अळणी आणि बेचव वाटू लागले.आईविना जिवनात काहीच राम राहिला नाही असे वाटल्याने आईच्या शोकाने वैफल्यग्रस्त होउन शिवाजी रावांनी आपली जिवनयात्रा आठरा एप्रिल रोजी संपविली म्हणजेआईच्या निधनानंतर मुलाने बरोबर पाचव्या दिवशी या जगाचा कायमचा निरोप घेतला.अशा या मायलेकाच्या आकस्मित निधनानंतर दहातोंडे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला. व्रुद्धेश्वर साखर कारखाना येथील अण्णासाहेब शिंदे क्रुषी तंत्रज्ञान महाविद्यालयातील शिक्षक संभाजीराव मरकड यांच्या यशोदाबाई दहातोंडे या सासुबाई होत्या. तर शिवाजी दहातोंडे हे मेव्हणे होते. अशा या मायलेकराच्या ताटातुटी नंतर विरहाने प्राणत्याग करणाऱ्या मुलाची ईतिहासात नोंद होणे अत्यंत गरजेचे आहे.प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button