Amarawati

आदिवासींच्या आत्मसन्मान ची लढाई सुरू – दशरथ मडावी

आदिवासींच्या आत्मसन्मान ची लढाई सुरू – दशरथ मडावी

अमरावती / प्रतिनिधी – लक्ष्मण पंधराम

भारत देशात १७००शे च्या कालखंडापासून सर्वात प्रथम आदिवासींनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला असे मत बिरसा क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी व्यक्त केले
मडावी म्हणाले, देशामध्ये ज्यांना इतिहासात वंचित ठेवण्यात आले त्याध्ये आदिवासी विरांची योग्य ते दखल शासनदरबारी इतिहासात घेतली गेली नाही.म्हणुन आदिवासींनी आपल्या महानायकांचा खरा इतिहास समजून घेतलं पाहिजे . ज्यांच्या हातात लेखणी होती त्यांनी आदिवासींच्या खरा इतिहास लोकांपर्यंत येवू दिला नाही.आणि आदिवासींच्या पराक्रमी इतिहासासोबत मोठ्या प्रमाणात छेडछाड करण्यात येथील वर्णांध इतिहासकारांनी कोणतीच कसूर केली नाही.

आम्हाला खरा इतिहास माहीत नसल्यामुळे आम्ही कधी कधी आमच्या विरोधात शासनाकडून व्यवस्थेकडुन घेतल्या जाणाऱ्या निर्णय धोरणांचा समर्थन करतो परिणामी आमच्या वर अत्याचार वाढत जाते त्यासाठी इतिहास समजुन वर्तमान दशा ओळखून योग्य दिशेने वाटचाल करण्याची वेळ आलेली आहे.
त्याच प्रमाणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री असताना ९२ हजार बोगस आदिवासी असल्याचे सभाग्रुहात त्यांनी सांगितले होते त्यानुसार शासनाने ९२ हजार आदिवासींना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पदमुक्त करुन खरा आदिवासींसाठी विशेष भरती मोहीम ते ९२हजार पद पूर्ण पणे भरेपर्यंत राबवावी.अलिकडे राबवलेली विशेष भरती मोहीम ही फार घाईघाईने राबविण्यात आली यामध्ये अनेक उमेदवारांना पुरेशा वेळ व माहीती मिळाली नाही त्यामुळे ते भरतीचा संधीपासून वंचित राहीले.अशीच भरती पून्हा राबविण्याची मागणी केली.

त्यावेळी बिरसा क्रांती दल राज्य संघटक अतुल कोवे, मध्यप्रदेश बैतूल जिल्हा अध्यक्ष अजय कवडे, अमरावती जिल्हा अध्यक्ष अर्जुन युवनाते, राज्य समन्वयक मारोती उईके, डॉ.रविकांत महिंदकर, सौ.लक्ष्मीबाई दारसिंबे, सौ.सुशिलाताई पाटिल, अमरावती जिल्हा महासचिव लक्ष्मण पंधराम, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत आत्राम, प्रा.चरणदास सोळंके, संतोषजी किरणाके, प्रविण सराटे, मेळघाट बिकेडी अध्यक्ष श्याम पाटणकर, अचलपूर तालुका अध्यक्ष भिमराव मसराम, चांदूरबाजार तालुका अध्यक्ष देवरस वरटी आदी नागरीक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button