Nandurbar

तेंडुलकर ने षटकार मारलं आणी ब्रायन लारा आऊट झालं?

तेंडुलकर ने षटकार मारलं आणी ब्रायन लारा आऊट झालं?

10:00 वाजे पर्यंत लाऊड स्पीकरची परवानगी असताना 11:30 पर्यंत जोमात मुशयरा वजा राजकीय पुढायांचा सुरु निवडणूक स्पेशल कार्यक्रम सुरु.

नंदुरबार/फहीम शेख

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निवडणूकीच्या आदल्या वर्षी दिनांक :- 04/05/2022 रोजी सत्ताधारी पक्षाच्या एका गाजलेल्या नगर सेवकाने शीर खुर्मा व मुशयरा कार्यक्रम ठेवला होता. मोठा गाजा वाजा करण्यात येऊन निमंत्रण पत्रिका छापून शहर भरात वाटप करण्यात आली, माझ्या घरी भी आली, शहरात गल्ली गल्ली ऑटो रिक्षा फिरवून भोंग्यात सदर कार्यक्रमात हजर राहण्याचे आव्हान करण्यात आले. ज्यामुळे सुमारे 150 ते 200 सामान्य लोक कार्यक्रमाचे वेळी व ठिकाणी जमले (पोलिस फिर्यादनुसार) होते परंतु सदर कार्यक्रम मागचा उद्देशा समजल्याने पत्रिकेत लिहिण्यात आलेले नावंमधुन अनेक मान्यवरांनी कार्यक्रमला अनुपस्थिती दर्शविली (हा विषय संशोधनाचा आहे की सदर मान्यवरांना विचारून त्यांचे नाव पत्रिकेत छापले गेले होते की फक्त गर्दी गोळा करण्यासाठी नावे स्वमर्जीने टाकण्यात आले) अजून यावर असे की त्यांचे स्वतःचे विशिष्ट समाजातील उर्वरित सर्व नगरसेवकांनी कार्यक्रमास पाठ दाखवली हे विशेष. मग नाईलाजाने ज्यांचे नाव पत्रिकेत नव्हते त्यांना स्टेजवर बोलावून सत्कार करण्यात आले व स्टेज वर बसवन्यात आले. राजकीय दृष्ट्या हे कृत्यही मतदार जनतेसाठी अनेक प्रश्न चिन्ह सोडणारे ठरले. सध्या मशिदिवरील भोंग्यांचा मुद्दा हाती धरून राज्यात कमालीचे राज कारण सुरु असतांना सुप्रीम कोर्टाचे आदेश बोट धरून दाखवले जातं असतांना स्टेज च्या मागे असलेली मशिदीच्या भिंतीला सदर कार्यक्रमाचे भोंगे बांधण्यात येऊन त्यात रात्री 11:30 वाजे पर्यंत मुशयरा सुरु राहिला ज्यात ध्वनी डेसिबल किती होते हे ही संज्ञानात घेणे योग्य आहे.
उशिरा का होईना पोलिसांनी याची दखल घेतली व शहर पोलिस ठाण्यात हारून अब्दुल रशीद हलवाई याच्या विरुद्ध पोलिस नाईक नरेंद्र देविदास देवराज यांनी फिर्याद नोंदवली असुन भां.द.वि. कलम 188 सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे दाखल करण्यात आले.
गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी चर्चेचा विषय बनला की पत्रिकेत असलेलं व स्टेजच्या फ्लेक्सवर मोठे चित्र असलेलं कनविनर वजा आयोजक ला सोडुन भलत्या वरच गुन्हा दाखल करून त्याला scape goat म्हणजे बली का बकरा करण्यात आलं. यात असलेले अस्सल महानुभाव व आरोपी असलेले महाशय हे दोन्ही वेगळी माणसे आहे जे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचे चीर परिचित आहे, म्हणुन नजरचुकीने झालं असा ही म्हणता येणार नाही. कार्यक्रमात ज्या नियमांची पायमल्ली झाली किंवा माय पॉवर मध्ये करण्यात आली त्यावर सर्व बाबींचा विचार करून पोलिसांनी गुन्ह्यामधील लावण्यात आलेल्या कलमांना बघून वाटते की अजुन योग्य कलमा लावणे बाकी आहे. हे उघडपणे दर्शवतात की पोलिसांना सत्ताधारी राजकारण्यांचा किती दाबावाखाली आपली नोकरीं करावी लागते.
आम्ही आपल्या प्रेक्षकांच्या अवलोकांनासाठी बातमीसह पत्रिकेची प्रत ही प्रदर्शित करीत आहोत.
सदर प्रकरण हा असाच झालं की तेंडुलकर ने षटकार मारलं आणी ब्रायन लारा आऊट झालं?
हा कसा झालं हा जनतेला विचार करायला लावणारा विषय आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button