Amarawati

आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांच्यावर कारवाई करा – बिरसा क्रांती दल अमरावती वतीने मागणी

आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांच्यावर कारवाई करा – बिरसा क्रांती दल अमरावती वतीने मागणी

अमरावती / प्रतिनिधी – लक्ष्मण पंधराम

बिरसा क्रांती दलाच्या वतीने मुख्यमंत्री सचिवालय कक्ष अमरावती येथे आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांच्या वर तात्काळ कारवाई करण्याच्या निवेदन द्वारे मागणी केली.
डॉ. किरण कुलकर्णी हे आदिवासी विकास विभागामध्ये आयुक्त पदावर विराजमान आहेत सदर आयुक्तांनी आदिवासी ऐवजी वनवासी हा शब्द प्रयोग करणे हे घटनाबाह्य असून आदिवासी समाजाची एक प्रकारे विटंबना आहे त्यामुळे समस्त आदिवासींच्या भावना दुखावल्या आहेत आदिवासी विकास विभागाचा प्रमुख पदावर असताना या पद्धतीने वक्तव्य करणे हे आयुक्त या पदाची गरिमाकमी करणारे आहे दिनांक १८ जानेवारी २०२० च्या दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध झाले आहे. या वनवासी शब्दाचा उल्लेख केल्याबद्दल डॉ किरण कुलकर्णी यांच्या जाहीर निषेध व्यक्त केला.

त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे अमरावती जिल्हाध्यक्ष अर्जुन युवनाते, मारोती उईके, जिल्हा महासचिव लक्ष्मण पंधराम, प्रविण सराटे,जगदेव इवने, शशिकांत आत्राम, नितीन नामुरते,
संतोष किरनाके, अनिल किरनाके,पवन चांदेकर, सोनल नामुरते आदी नागरीक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button