Nashik

मुलांना आदर्श बनवण्यासाठी पालकांचा सहभाग महत्वाचा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोसावी यांचे प्रतिपादन

मुलांना आदर्श बनवण्यासाठी पालकांचा सहभाग महत्वाचा

मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोसावी यांचे प्रतिपादन

सुनिल घुमरे प्रतिनिधी । दिंडोरी नाशिक

मुलांना आजूबाजूच्या वातावरणात विषयी कुतुहल असते, त्यामुळे मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना पालकांनी उत्तरे दिली पाहिजे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे, सर्व शिक्षक मुलांना सोप्या भाषेत ऑनलाइन शिक्षण देत आहे, मुलांना आदर्श बनविण्यासाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोसावी यांनी केले.

तालुक्यातील करंजवन येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पालकांशी संवाद साधण्यात आला यावेळी ते बोलत होते, यावेळी पंचायत समिती सदस्य मालती खराटे, उपसरपंच रवींद्र मोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शोभा मोरे, माधवराव मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते, यावेळी विद्यार्थ्यांसाठी 200 मास्क चे मोफत वाटप करण्यात आले, यावेळी प्रकाश गोसावी यांनी पालकांना विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ, सुप्त गुणांची जोपासना, मुलांच्या जिज्ञासू मनाला प्रोत्साहन, आदींबाबत मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button