Chandwad

चांदवड शहरात खड्ड्यांचे साम्राज्य,प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

चांदवड शहरात खड्ड्यांचे साम्राज्य,प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहर सध्या समस्यांनी ग्रासलेले असून त्या प्रशासनाने लक्ष देऊन सोडविल्या पाहिजे अशी अपेक्षा रहिवासी नागरिक व्यक्त करीत आहेत.सध्या नवरात्र उत्सव सुरू झाला असून बाजारपेठेतून तसेच शहरातील विविध नगरातून महिलावर्ग पहाटे व सकाळी रेणुका देवी दर्शनाला जात असतात.रस्त्याने चालताना खड्डे असल्याने याबाबत नगरपरिषदेने मुरूम टाकून खड्डे बुजविणे आवश्यक आहे.गीतकमल सोसायटी मधील स्थानिक रहिवासी श्री सुनील कासव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या परिसरातील खड्ड्यांच्या समस्या मांडल्या.या खड्ड्यांमधून गाडी चालविणे मुश्किल झाले आहे.
उपजिल्हा रुग्णालयापासून पोलीस स्टेशनकडे जाताना लेंडी नदी पुलावर सुद्धा एक खड्डा आरपार झाला असून या रस्त्याने प्रशासकीय वाहनांचा वापर असूनही का दुर्लक्ष होत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नगरपरिषद नाले साफसफाई कडे सुद्धा दुर्लक्ष करीत असून नाल्यांमध्ये मोठमोठे झुडपे निर्माण झाले असून सापांचे वास्तव्य असल्याने नागरिकांना भीती निर्माण झाली आहे.काही दिवसात परतीचा पाऊस सुरू होत असल्याने प्रशासनाने आता तरी लक्ष देऊन खड्डे बुजविणे व नाले साफसफाई करणे अपेक्षित आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button