Chandwad

नाथाभाऊंच्या स्वागत गर्दीतील सोनसाखळी चोर चांदवड पोलिसांच्या ताब्यात..

नाथाभाऊंच्या स्वागत गर्दीतील सोनसाखळी चोर चांदवड पोलिसांच्या ताब्यात..


प्रतिनिधी : उदय वायकोळे चांदवड

चांदवड : भाजपातुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांचे मुंबईकडून जळगावकडे जातांना ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. चांदवड शहरातील पेट्रोलपंप चौफुलीवर अशाच स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत प्रसाद देशमुख (रा. लोहोणेर ता. देवळा) यांचाही समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन प्रसाद यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले. याबाबत लगेचच चांदवड पोलिसांना अवगत केल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी मालेगाव-नाशिक-मनमाडसह चांदवड शहरात पथके रवाना केली. सोबतच सोशल मीडियातील सत्काराचे अनेक फोटो व व्हिडिओ ताब्यात घेऊन निरीक्षण केले असता एक तरुण सोनसाखळी काढतांना आढळून आला होता.

याबाबतची माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, अप्पर पो. अधीक्षक ग्रामीण शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून आपल्या कर्मचाऱ्यांचे पथक सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी बीड कडे रवाना केले. बीड स्थानिक पोलिसांच्या मदतीने लोकेशनवर जात आरोपी प्रवीण विजय गायकवाड (रा. बीड) याची अंगझडती घेताच अंदाजे 12 तोळे वजनाची सोनसाखळी अंदाजे किंमत सात लाख छपन्न हजार रुपये आढळून आली. विचारपूस करताच सदर सोनसाखळी चांदवड येथून चोरल्याची कबुली आरोपीने दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button