Nashik

अत्याधुनिक उपचारांच्या सुविधांना प्राधान्य आणि प्रतिबंधात्मक देखभालीवर भर देत आरोग्य क्षेत्रात समग्र कार्य करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार

अत्याधुनिक उपचारांच्या सुविधांना प्राधान्य आणि प्रतिबंधात्मक देखभालीवर भर देत आरोग्य क्षेत्रात समग्र कार्य करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार

नासिक विभागिय प्रतिनिधी सुनिल घुमरे

गरीबांचा उपचारांवरील खर्च कमी करण्याबरोबरच डॉक्टरांच्या संख्येत वाढ करण्याचे सरकारचे प्रयत्न- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.भारती पवार

तेलंगणमधल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमात डॉ. भारती पवार यांचे उपस्थितांना मार्गदर्शन

देशातील जनतेसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर आणि प्रतिबंधात्मक देखभालीवर केंद्र सरकार भर देत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली देशातील जनतेसाठी आरोग्य क्षेत्रात समग्र कार्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितलं आहे. त्या आज हैदराबादमध्ये तेलंगण इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सच्या दुसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होत्या. देशातल्या जनतेचा विशेषतः गरीबांचा उपचारांवरील लागणार अधिकचा खर्च कमी झाला पाहिजे त्याचबरोबर देशात डॉक्टरांच्या संख्येतही वाढ झाली पाहिजे, यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी 27 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा केली होती. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याचे या मिशनचे उद्दिष्ट आहे. आरोग्य ओळखपत्र, डॉक्टर आणि आरोग्य सुविधांसाठी विशिष्ट ओळख, वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड, टेलिमेडीसिन आणि ई-फार्मसीसह एक राष्ट्रीय डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. या योजनेंतर्गत राष्ट्रीय डिजिटल आरोग्य व्यवस्था निर्माण करायची आहे अशी माहिती ना.पवार यांनी दिली. यावेळी आरोग्य राज्यमंत्र्यांनी तेलंगणच्या एम्सने गेल्या दोन वर्षातल्या वाटचालीदरम्यान केलेल्या कार्याची प्रशंसा केली. या संस्थेने शैक्षणिक आणि रुग्णसेवेवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे, असंही त्या म्हणाल्या. हैदराबादच्या शहरी क्षेत्राजवळ असण्याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे ही संस्था तिच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे विशेष महत्त्वाची ठरली आहे, असं त्यांनी सांगितलं. आगामी काळात ही संस्था देशातल्या सर्वोत्तम आरोग्य संस्थांपैकी एक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला एम्सचे अधिष्ठाता डॉ. राहुल नारंग, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. विकास भाटिया, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरु प्रो.बी.जे. राव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button