Nashik

विवाह जमवणाऱ्या दलालांकडून फसवणूक झालेल्या कुटुंबाचे पैसे परत

विवाह जमवणाऱ्या दलालांकडून फसवणूक झालेल्या कुटुंबाचे पैसे परत

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील
दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के येथे गरीब माणसाकडे पैसे घेऊन विवाह जमवणाऱ्या दलालांनी फसवणूक केल्याने म्हेळुस्के ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ यांनी संबंधित दलालांच्या मुसक्या आवळून त्या गरीब सामान्यकुटुंबाला न्याय मिळवून दिला.
याबाबत अधिक माहिती अशी कि,म्हेळुस्के येथील रहिवाशी लक्ष्मण दादाजी उगले यांचे चिरंजीव किरण यांचा विवाह करण्यासाठी मध्यस्थी लोकांनी तुमच्या मुलाचे लग्न जमवुन देतो असे सांगून मोठी फसवणूक केली होती.सर्वप्रथम त्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला व एक लाख रुपयांची मागणी केली आणि त्यानुसार मुलाकडील परिवाराने लग्न जमविणाऱ्या मध्यस्थीना घरातील असतील त्या वस्तू,दागिने तसेच हात उसने पैसे घेऊन एक लाख रुपये जमा करून दिले. आणि ठरल्या प्रमाणे म्हेळूस्के येथील रहिवाशी किरण लक्ष्मण उगले यांचा विवाह घाटळबारी येथील यमुना यशवंत भोये ह्या मुलीशी करण्यात आला होता.सदर विवाहासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी व मध्यस्थी माधव वामन गायकवाड रा.अंबाड,लहानु काशीराम कांबडी रा.पिंपळपाडा यांनी 1लाख रुपये घेतले होते.परंतु सदर मुलगी ही लग्नानंतर ५ दिवसांतच पळून गेली.त्यामुळे घटनेने मुलाकडील परिवार घाबरला गेला. ही बाब ताबडतोब नवरदेव मुलगा किरण उगले यांनी म्हेळुस्के गावचे उपसरपंच योगेश बर्डे, सरपंच योगिता बर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष हरि बर्डे, गोटीराम बर्डे,भगवंत बर्डे यांच्यासह इतर ग्रामस्थांना सांगितली.गावातील ग्रामस्थांनी याचा खोलवर तपास करून कुठे पाणी मुरते याचा तातडीने तपास केला….त्यानंतर मध्यस्थी यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि मोठ्या प्रयासाने मध्यस्थी आणि मुलीकडील इतर कुटुंबीयांचा तपास लागला. दोन्ही मध्यस्थीना ताबडतोब घेऊन ग्रामपंचायत म्हेळूस्के येथे आणले व त्यांना पोलीस स्टेशनचा धाक दाखवुन तंबी देण्यात आली व १५ दिवसांच्या आत पैसे आणून देण्यास सांगितले. त्यानुसार दोन्ही मध्यस्थी यांनी घेतलेली एक लाख रुपयांची रक्कम त्वरित म्हेळूस्के गावी आणून दिली.यावेळी सर्व पदाधिकारी यांनी सदर रक्कम पिडित कुटुंबाच्या स्वाधीन केली. सदर कुटुंबाने त्यांना पैसे परत मिळून दिल्याने म्हेळूस्के ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच ,तसेच तंटा मुक्तीचे अध्यक्ष,ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले.
त्याचबरोबर माधव वामन गायकवाड रा.अंबाड ता.दिंडोरी,व लहानु काशिराम कामडी रा.पिंपळपाडा ता. दिंडोरी हे लग्न जमवुन देण्याकरिता पैसे घेऊन लोकांची फसवणूक करतात, त्यामुळे ह्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन म्हेळूस्के ग्रामपंचायतचे उपसरपंच योगेश बर्डे व ग्रामस्थांनी केले आहे.
फसवणूक झालेल्या कुटुंबाचे पैसे सुपूर्द करतांना उपसरपंच योगेश बर्डे यांच्यासह ग्रामस्थ.(छाया-गोरख जोपळे,म्हेळुस्के)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button