Nashik

Breaking: नव्या वर्षात ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक; प्रति युनिटसाठी इतके पैसे मोजावे लागणार..

Breaking: नव्या वर्षात ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक; प्रति युनिटसाठी इतके पैसे मोजावे लागणार..

‘महानिर्मिती’ आणि ‘महापारेषण’ कंपन्यांनी दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगापुढे फेर आढावा याचिका सादर केल्या आहेत. या याचिकांना मंजुरी मिळाल्यास वीज ग्राहकांवर प्रति युनिट एक रुपया ३५ पैशांचा बोजा पडणार आहे. त्यातच ‘महावितरण’कडूनही दरवाढीची मागणी केली जाणार असल्याने, नव्या वर्षात नागरिकांना वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे.

वीजदरनिश्चितीचा आदेश जाहीर

राज्य वीज नियामक आयोगाने ३० मार्च २०२० रोजी पुढील पाच वर्षांसाठी (मार्च २०२५ अखेर) बहुवर्षीय वीजदरनिश्चितीचा आदेश जाहीर केला आहे. कायद्यातील या तरतुदीनुसार तिसऱ्या वर्षी वीज कंपन्यांना फेर आढावा याचिका दाखल करता येते. त्यानुसार, ‘महानिर्मिती’ व ‘महापारेषण’ या दोन कंपन्यांनी दरांच्या फेर आढाव्यासाठी याचिका आयोगापुढे दाखल केल्या आहेत.

महानिर्मिती’ची मागणी
‘महानिर्मिती’ कंपनीने मागील चार वर्षांतील जादा खर्च व येणाऱ्या दोन वर्षांतील अपेक्षित जादा खर्च यासाठी पूर्वी आयोगाने मंजूर केलेल्या रकमेव्यतिरिक्त एकूण २४ हजार ८३२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाढीची मागणी केली आहे. आगामी दोन वर्षांमध्ये वसुली केल्यास त्याचा ग्राहकांवरील सरासरी परिणाम एक रुपया तीन पैसे प्रति युनिट याप्रमाणे होणार आहे.

महापारेषण’ची मागणी

‘महापारेषण’ कंपनीने मागील खर्चातील वाढ व पुढील दोन वर्षांतील जादा खर्च यासाठी एकूण फरकाची वाढीव मागणी सात हजार ८१८ कोटी रुपयांची केली आहे. आगामी दोन वर्षांमध्ये वसुली केल्यास त्याचा ग्राहकांवरील परिणाम सरासरी ३२ पैसे प्रति युनिट याप्रमाणे होणार आहे. या दोन कंपन्यांची एकूण दरवाढ मागणी एक रुपया ३५ पैसे प्रति युनिट याप्रमाणे आहे. याशिवाय ‘महावितरण’ कंपनीकडूनही दरवाढीची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे वीजबिलात प्रचंड वाढीचा बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे़

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button