Nandurbar

पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 34 अमंलदारांना नूतन वर्षानिमीत्त पदोन्नतीची भेट

पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 34 अमंलदारांना नूतन वर्षानिमीत्त पदोन्नतीची भेट

नंदुरबार फहिम शेख

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा
पदभार स्वीकारल्यानंतर जनतेसाठीच नव्हे तर पोलीस दलातील अमंलदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून अत्यंत कमी वेळेत जनतेच्या आणि नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे वर्षानूवर्षे पोलीस दलात परिश्रम करुन पोलीस अमंलदार आपल्या पदोन्नतीची वाट पाहत असतात. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी पदोन्नती देणाऱ्या संबंधीत शाखेचे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नंदुरबार जिल्ह्यातील पदोन्नतीस सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अमंलदारांना पदोन्नती देणेबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन नववर्षाच्या पूर्वसंध्येस 34 पोलीस हवालदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक (A.S.I.) या पदावर पदोन्नती देण्यात आली. नववर्षाच्या बंदोबस्तात सर्व अधिकारी व अमंलदार व्यस्त असतांना पोलीस हवालदारांना अचानक संध्याकाळी अशी पदोन्नती झाल्याची बातमी मिळाल्याने पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एकुण 34 पोलीस हवालदारांना सेवा जेष्ठतेनूसार सहा. पोलीस उप निरीक्षक (A.S.I.) पदोन्नती देऊन नववर्षाची जणु भेटच दिलेली आहे पोलीस दलात सुमारे 30 ते 35 वर्षे अथक परिश्रम घेऊन सेवा करणाऱ्या अमंलदारांचा सहा. पोलीस उप निरीक्षक हा पदोन्नतीचा जवळ-जवळ शेवटचा टप्पा असतो त्यानंतर बहुतेक अमंलदार हे पोलीस दलातुन सेवानिवृत्त होत असतात. पोलीस अधक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी 34 पोलीस हवालदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक (A.S.I.) या पदावर पदोन्नती दिल्यामुळे पोलीस हवालदारांना पोलीस दलात बजावलेली सेवा सफल झाल्यासारखे वाटले पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अमंलदारांना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी पदोन्नती बाबत अभिनंदन करुन नव वर्षाच्या व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पदोन्न्ती झालेले अमंलदारांची नावे खालीलप्रमाणे,

1 ) पितांबर रतन पाडवी 2) राजु जयसिंग जाधव 3) लख्क्षमण गजमल कोळी 4) मुंगज्या जत्र्या पाडवी 5 ) हर्षल पंडीत रोकडे 6)विरसिंग बापु वळवी 7) गिरधन महारु सोनवणे 8 ) पानाजी फत्तु वसावे 9) फुलसिंग मांजय पटले 10 ) मुकेश राधीया गावीत 11 ) मोहनलाल रेवजी वळवी 12 ) विठ्ठल विका पावरा 13 ) राजेंद्र शंकर दाभाडे 14) राजेश सखाराम ठाकरे 15) राजेंद्र निळकंट चव्हाण 16) सुपुडू रुपसिंग पाडवी 17 ) गिरधर भिका माळीच 18 ) नरेंद्र करणसिंग वळवी 19) सुकलाल जतन भिल 20) राजु देविदास पारोळेकर 21 ) वंतु भिकाऱ्या गावीत 22 ) युवराज पानसिंग रावताळे 23 ) फारुकबेग मोगलबेग मिर्झा 24 )गणेश भिकाजी वसावे 25) कृष्णा पौलाद पवार 26) वासुदेव प्रतापसिंग वसावे 27 ) सादीक शफिक शेख 28 ) प्रदीपसिंग देवनाथसिंग राजपुत 29) संजय भिमराव मराठे 30 ) दिपक नामदेव पाटील 31) संजय चिंधू पाटील 32 ) रविंद्र रमेश पवार 33) विकास पिरन पवार 34) मुरारजी आलू वळवी
नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलीस अधिकारी व अमंलदारांचे देखील अडी-अडचणी व समस्या वेळेवेर सोडविल्या जातील तसेच गैर कायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button