sawada

सावदा खाजगी उर्दु प्राथमिक शाळा येथे टीईटी वर्कशॉप कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

सावदा खाजगी उर्दु प्राथमिक शाळा येथे टीईटी वर्कशॉप कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे अल्कली एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी द्वारे संचालित खाजगी उर्दू प्राथमिक शाळा सावदा तर्फे नुकतेच आयोजित करण्यात आलेली टीईटी कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण व नात शरीफ पठणाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सैय्यद अजगर सैय्यद तूकडू होते. दीप प्रज्वलन संस्थेचे सचिव अय्युब खान दलमिर खान यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी केले. त्यानंतर कार्यक्रमात उपस्थित सन्माननीय नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात.

येत्या ३० ऑक्टोबर २०२१ ला होणाऱ्या टीईटी वर्कशॉप परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना किचकट कठीण वाटणारी टीईटी परीक्षा सुलभ पद्धतीने कशी पार पाडता येईल याबाबत उर्दू इंग्रजी गणित इत्यादी विविध विषयांचे गुणांचे विभाजन करून याबाबत विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल व त्यांना भविष्यात टीईटी परीक्षा चे गुण कसे महत्वाचे राहणार ते जळगाव येथील सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ आली अंजुम रिजवी यांनी घडी व दिनदर्शिका च्या माध्यमाने सोडवून दाखवले ल अतिशय उत्तम साधरण पणे मार्गदर्शन करून इ‌.१ ते ५ सह ६ वी ते ८ वी पर्यंत ची प्रश्नपत्रिका संदर्भात कशा पद्धतीने अभ्यास करावा याचेही पण मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमात यावल चोपडा भुसावळ मुक्ताईनगर येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते त्यात विशेष कर मुलींचा देखील सहभाग अधिक होता. यानंतर संस्थेचे अध्यक्ष सय्यद असगर यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात अल्ल कवी संस्थेची प्राथमिक शाळा द्वारे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद बशारत सर अध्यक्ष आयडियल हाय स्कुल मारुळ नासीरखान सर मुख्याध्यापक अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर,शेख अख्तर मतवाली, युनूस खान, अजमल खान साहब,सलाउद्दीन, अआबीद सर,इरफान खान सर, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम जनाब यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाकीर सर,असद सर,सादिक सर,सद्दाम सर अश्फाक सर,नबीला मॅडम यांनी परिश्रम घेतले.व आभार मुख्याध्यापक जफर खान मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button