Nashik

ना. छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या प्रयत्नातून तामिळनाडू येथे रेल्वे प्रशिक्षण घेणारे मनमाडचे विद्यार्थी परतले सुखरूप……

ना. छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या प्रयत्नातून तामिळनाडू येथे रेल्वे प्रशिक्षण घेणारे मनमाडचे विद्यार्थी परतले सुखरूप……

शांताराम दुनबळे

नाशिक – प्रतिनिधी शांताराम दुनबळे तामिळनाडू राज्यात येरवड येथे रेल्वे विभागात प्रशिक्षण घेत असलेले मनमाड येथील १२ विद्यार्थी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे याठिकाणी अडकले होते. हे विद्यार्थी सेलम, मिरज येथून जळगाव पर्यंत पोहचल्यानंतर ना.छगन भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रयत्नातून खाजगी बसच्या माध्यमातून आज मनमाड येथे सुखरूप पोहचले आहे.

तामिळनाडू राज्यात येरवड येथे रेल्वे विभागात प्रशिक्षण घेत असलेले मनमाड येथील विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनमुळे त्याच ठिकाणी अडकल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्याशी संपर्क करत घरी परतण्यासाठी मदत मागितली. त्यानंतर पंकज भुजबळ यांनी पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या घरी परतण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने नियोजन केले. हे सर्व विद्यार्थी तामिळनाडू येथून सेलम त्यांनतर मिरज सांगली येथून जळगाव येथे पोहचल्यावर त्यांना मनमाड येथे परतण्यासाठी खाजगी बसची व्यवस्था केली. तेथून आज हे सर्व विद्यार्थी सुखरूप घरी पोहचले आहे.

लॉगडाऊन सुरू असल्याने आम्ही तामिळनाडू राज्यात येरवड येथे रेल्वे विभागात प्रशिक्षण घेणारे १२ विद्यार्थी याच ठिकाणी अडकलो होतो. त्यानंतर आम्ही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे परतण्यासाठी मदत मागितली. त्यांनी तात्काळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड येथे सुखरूप पोहचण्याची व्यवस्था केली. प्रवासात ते सातत्याने आमच्याशी संपर्कात होते. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अडचणी आल्या त्या त्यांनी तात्काळ सोडविल्या. आम्ही सर्व विद्यार्थी पालकमंत्री ना.छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांचे आभारी आहोत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button