Dimbhe

जिद्द व मेहनत घेतली तर अदभूतपुर्वक यश मिळते – डॉ मंगेश गोंदावले, डिंभे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा

जिद्द व मेहनत घेतली तर अदभूतपुर्वक यश मिळते – डॉ मंगेश गोंदावले,
डिंभे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा

डिंभे / प्रतिनिधी -दिलीप आंबवणे

डिंभे येथे सह्याद्री आदिवासी नोकरदार फुलवडे यांच्यावतीने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबादचे डॉ मंगेश गोंदावले यांनी मार्गदर्शन केले.

माजी सनदी अधिकारी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त मा. पी. डी. करवंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी बोलताना गोंदावले म्हणाले, स्पर्धा परीक्षेतील यश हे किती नामांकीत शाळेत शिकलो यावर अवलंबून नसून केवळ गुणवत्तेवरच अधारीत असून सामान्य वर्गातूनच स्पर्धा परीक्षांत यश मिळवणारांचे प्रमाण अधिक असल्याचे आवर्जून सांगितले.

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी डॉक्टर अब्दुल कलामांचा आदर्श समोर ठेवावा. यशाच्या शिखरावर असलेल्या अनेक नामांकीत व्यक्तिमत्वांना आयुष्यात प्रथम अपयशाचा सामना करावा लागल्याचे उदाहरणासह सांगून अपयशाने कधीही खचून जाऊ नका हा संदेश त्यांनी दिला. जिद्द प्लस मेहनत बरोबर अभुतपुर्व यश हा फार्म्युलाही त्यांनी विद्यार्थी व पालकांना दिला.

विद्यार्थ्यांनी धेय्य निश्चित करावे, टी. व्ही. व मोबाईल वापरावर नियंत्रण ठेऊन वेळेचे योग्य नियोजन करावे तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना सतत पाठींबा व प्रोत्साहन द्यावे , ज्ञान सर्वबाजूंनी मिळत असते ते ग्रहण करायला सदैव तत्पर रहायला हवे. प्रत्येक विषयाचा सखोल आभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षांत निश्चित यश प्राप्त होते हा मंत्र त्यांनी यावेळी दिला.

त्याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी व माळीण गावचे सुपुत्र मा. कृष्णा यशवंत भालचिम दांम्पत्याचा आदिवासी भागातील शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी सत्कार करण्यात आला.
त्यावेळी सह्याद्री आदिवासी नोकरदार फुलवडे अध्यक्ष सुधिर घोटकर, बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. इंद्रजित जाधव, जनता विद्या मंदिर,घोडेगावचे मुख्याध्यापक माळवे सर, श्रीरंग गभाले विद्यालयाचे मुख्याध्यापक निंबाळकर सर, फुलवडे गावच्या सरपंच मनिषाताई नंदकर,खरेदी विक्री संचालक बबन मोहरे,कवी मनोहर मोहरे आदि मान्यवर व नोकरदारवर्ग फुलवडे परीसरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button