Nandurbar

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांच्याकडून जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांच्याकडून जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन

नंदुरबार

पत्रकारावर हल्ला होऊ नये म्हणून निषेध करण्यात आला व पुढील कारवाईसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नागपूर जिल्हाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती चे ग्रामीण व दैनिक महाभारताचे पत्रकार श्री सतीश भालेराव यांना हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बळीराम परदेशी यांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्ताकन करण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील पुसद येथील धाडसी पत्रकार संदेश कान व पत्रकार सय्यद पहचान यांच्यावर तीस ते चाळीस गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केला व पत्रकारांच्या जवळील वृत्तांकन करण्यासाठी चे अंदाजे 80 हजार रुपयांचे साहित्य लुटून नेले लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर हा हल्ला असून याबाबत पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 सुधारणा 2019 तात्काळ कारवाई करण्यात यावी व पीडित पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे शासकीय समित्या पोलीस दक्षता समिती शांतता समिती आयोग्य समिती शालेय व्यवस्थापन समिती महामंडळ व शासनाच्या नियंत्रणाखाली असलेले ट्रस्ट यामध्ये पत्रकारांना प्रधान्य नियुक्ती करण्यात यावी राज्यात नी भांडी पत्रकारिता पत्रकारांवर अवैध व्यवसायिक वाळू माफिया व इतर बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीकडून अथवा त्यांच्या गुंडा कडून हल्ले केले जात जातात अथवा पत्रकारांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून विनाकारण त्रास दिला जातो या आणि वेळा भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट लोकप्रतिनिधी देखील सामील होतात यावेळी पत्रकार अधिनियम 2019 द्वारे संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी ग्रामीण पत्रकारांना अधिस्विकृतीधारक पत्रकार म्हणून लाभ मिळावा यासाठी किचकट निकषांमध्ये बदल करण्यात यावे व नियम शिथिल करण्यात करावे तसेच अधिस्वीकृती धारक बाबतचे अधिकार त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांना देण्यात यावे कोरूना च्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात यावी आणि शासनाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार दिली जातात त्याच धर्तीवर जिल्ह्यातील पत्रकारांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे व शासनाने वय 60 पूर्ण झाल्यावर सर्व निकष तपासून ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती दिली होती व आता सन्मान चा लाभ देताना टाकून ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानाच्या लाभ पासून दूर ठेवले जात आहे हे अन्यायकारक आहे याबाबत शासनाने लक्ष घालावे तसेच ज्येष्ठ पत्रकारांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा असे पत्र जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघ नंदुरबार यांच्यावतीने, शेख फहिम महोम्मद (जिल्हा उपाध्यक्ष),सईद कुरेशी (जिल्हा कार्याध्यक्ष), निर्मलाताई सोनवणे, शेख अमिनुद्दिन,शेख जुबेर अहमद,लोटन अण्णा पेंढारकर,साजिद बागवान व तोपिक पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button