Nashik

शैक्षणिक प्रगतीसाठी वाचन संस्कृती महत्वाची युवा नेते तुकाराम जोंधळे यांचे मोहाडी येथे प्रतिपादन

शैक्षणिक प्रगतीसाठी वाचन संस्कृती महत्वाची

युवा नेते तुकाराम जोंधळे यांचे मोहाडी येथे प्रतिपादन

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी ग्रामीण भागात अनेक गावे आजही शिक्षणापासून वंचित आहेत, गावाची व देशाची प्रगती साधण्यासाठी शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, शैक्षणिक प्रगतीसाठी वाचन संस्कृती महत्वाची आहे, असे प्रतिपादन युवा नेते तुकाराम जोंधळे यांनी केले,
तालुक्यातील मोहाडी येथे मूकनायक वाचनालयास तुकाराम जोंधळे यांनी 250 पुस्तके भेट दिले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर तुकाराम जोंधळे, अरुण चौरे, माजी ग्रामपालिका सदस्य किरण नाईक, प्रकाश निकम, लक्ष्मण देशमुख, शंकर ठाकूर, रत्नाकर निकम, किशोर देशमुख, आदी उपस्थित होते, यावेळी जोंधळे म्हणाले की आज ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक धोरणापासून वंचित आहेत, गावातून जर एखादा विद्यार्थी अधिकारी झाला तर गावचे नाव रोशन होते, त्यामुळे शैक्षणिक प्रगतीसाठी वाचन संस्कृती महत्वाची आहे, असे सांगितले, यावेळी वाचनालयाच्या वतीने तुकाराम जोंधळे, अरुण चौरे,यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी दिलीप निकम, अशोक आहिरे, चंद्रकांत आहिरे, प्रमोद निकम, सोनाभाऊ निकम, कमलाकर निकम, योगेश निकम, अमोल घोलप, शरद घोलप, केदारनाथ क्षिरसागर, आदी उपस्थित होते, सूत्रसंचालन अमोल घोलप यांनी केले, तर आभार शंकर ठाकूर यांनी मानले,

फोटो

मोहाडी येथील मूकनायक वाचनालयास युवानेते तुकाराम जोंधळे यांनी 250 पुस्तके भेट दिले यावेळी उपस्थित अरुण चौरे, माजी ग्रामपालिका सदस्य किरण नाईक, प्रकाश निकम, लक्ष्मण देशमुख, शंकर ठाकूर, रत्नाकर निकम, किशोर देशमुख, आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button