Pandharpur

दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या  हल्ल्याची चौकशी करण्याचीबशिवबुध्द युवा प्रतिष्ठानची  मागणी

दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचीबशिवबुध्द युवा प्रतिष्ठानची मागणी

देशाची राजधानी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर भारत देशाची राजधानी असलेली दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक घटनेने हादरली आहे. जवाहरलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) परिसरात झालेल्या हिंसाचाराचे प्रतिसाद महाराष्ट्रातही उमटलेत. मुंबईत विद्यार्थ्यांनी आंदोलने केलीत. महाराष्ट्रातील मंत्री, अभिनेते यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संदिपराजे मुटकुळे यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी या प्रकरणात भाजपाला दोषी धरले आहे. या घटनेत भाजपाचा हात असल्याचे संदिपराजे मुटकुळे यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेची सखोल चोकशी झाली पाहीजे असेही ते म्हणाले.
“जेएनयूमध्ये काल जी घटना झाली त्यात सर्वसामान्य मुलं मुली होते. गेल्या दोन महिन्यापूर्वी जी फी दरवाढ झाली होती. त्याविरोधात एक शांततेत गांधींजींच्या विचारावर आंदोलन सुरु होतं. साबरमती या हॉस्टेलजवळ हे आंदोलन सुरु होतं. मात्र हे आंदोलन सुरु असताना 40 मुलं त्यात ठिकाणी येतात. जर कोणत्याही इन्सिट्यूटमध्ये आत यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पास घ्यावा लागतो. तेथे नोंदणी करावी लागते. तुमची कागदपत्र द्यावी लागतात. मग अशा परिस्थितीत ती मुलं त्या ठिकाणी कशी आली?” असा प्रश्नही संदिपराजे मुटकुळे यांनी उपस्थितीत केला.
तसेच युनिव्हर्सिटीच्या बाहेर पोलिस उपस्थितीत असतानाही ही घटना आत 2 ते अडीच तास सुरु होती. मग त्यावेळी पोलिस आत का गेले नाही? असेही ते यावेळी म्हणाले.
“कुलगुरू हे विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या हितासाठी असतात. मात्र गेले दीड ते दोन महिने कुलगुरु दिसत नाही. काल (5 जानेवारी) सेमिस्टर परीक्षेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. यात 8 हजारांपैकी फक्त दोन हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरु शकले. कारण विद्यापीठातील इंटरनेट बंद होतं.” असेही संदिपराजे मुटकुळे म्हणाले.
मग अशा सर्व परिस्थितीत त्या ठिकाणी मुल-मुलींना अतिशय वाईट पद्धतीने मारलं जातं. अशी घटना देशात घडत असेल. तर मग साबरमती हॉस्टेलसमोर गांधीजींच्या विचाराने शांततेत हे आंदोलन सुरु होतं. मात्र काही लोकांना शांततेत आंदोलन केलेलं आवडत नाही का? असेही संदिपराजे मुटकुळे म्हणाले. जर शांततेत आंदोलन सुरु असेल तर मुद्दाम त्रास दिला जातो का? असा प्रश्नही शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button