Nashik

दिंडोरी तालुक्यात कृषी विभागा कडून नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पंचनामे सुरू

दिंडोरी तालुक्यात कृषी विभागा कडून नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पंचनामे सुरू

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड ,खडक सुकेना ,कुर्नोली या गावांमध्ये कृषी विभागाचे कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कडून शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी अवकाळी पावसामुळे कांदा व द्राक्ष बागेची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे नुकसान कधीही भरून निघण्या यासारखे नाही या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे अवकाळी पावसामुळे काही द्राक्ष बागा फुलोरा अवस्थेत व दोडा अवस्थेत असल्यामुळे द्राक्ष पिकाची कुज व गळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षाचे पीक वाया गेले यासाठी झालेल्या द्राक्ष पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू झाले आहे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन कृषी सहाय्यक रूपाली लोखंडे ग्राम विकास अधिकारी नानासाहेब तांबे उपसरपंच दादासाहेब पाटील ,शिवानंद संधान ,सुभाष मातेरे, विजय पाटील यांनी द्राक्ष पिकाचे पंचनामे केले ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले असेल त्यांनी कृषी विभाग व चिंचखेड ग्रामपंचायत ची संपर्क साधावा असे आव्हान सरपंच मीनाक्षी गुंबाडे यांनी केले आहे प्रसंगी शेतकरी अनिल संधान ,नवनाथ जगताप ,कैलास संधान, नाना संधान, रावसाहेब मेधने ,गोपाळ जाधव ,अजय संधान योगेश फुकट शिवा गायकवाड नामदेव पाटील संतोष वाळके आदी शेतकरी उपस्थित होते.

फोटो चिंचखेड येथे द्राक्ष पिकांचे पंचनामे करताना कृषी सहाय्यक रूपाली लोखंडे ग्राम विकास अधिकारी नानासाहेब तांबे शेतकरी गोपीनाथ जाधव अनिल संधान नवनाथ जगताप …

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button