India

Sleep Divorce:काय आहे नवीन फॅड “स्लिप डिव्होर्स”..!नवीन पिढीत वाढतेय ही संकल्पना..!

Sleep Divorce:काय आहे नवीन फॅड “स्लिप डिव्होर्स”..!नवीन पिढीत वाढतेय ही संकल्पना..!

लग्न झाल्यावर रोज रात्री एकमेकांसोबत बेड शेअर करणे ही कपल्ससाठी सामान्य गोष्ट असली तरी एक खूप खास गोष्ट सुद्धा आहे. कारण हा तो वेळ असतो जो जोडप्याला खरा एकांत देतो. हा वेळ ज्या कपल्सना नीट वापरता येतो त्यांचे नाते अधिक घट्ट होते. पण ज्यांना या वेळेचे महत्त्व माहित नसते वा ते याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा ते नाते खराब व्हायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जर एक कपल म्हणून एकच बेड शेअर करत असाल उत्तम. पण जर तुम्ही एकाच घरात राहून वेगवेगळे झोपत साल तर ही एक गंभीर गोष्ट आहे. अर्थात असे वेगवेगळे झोपण्याला अनेक करणे देखील कारणीभूत असू शकतात.

झोपताना जोडीदार जर मोठमोठ्याने घोरत असेल वा तुमच्या जोडीदाराला रोज लाईट लावूनच झोपायची सवय असेल तर अशावेळी अनेकदा कंटाळून कपल्स वेगवेगळे झोपणे पसंत करतात. जर अशी स्थिती निर्माण झाली तर त्याला Sleep Divorce म्हणतात का? तर मंडळी होय, जेव्हा कपल्स स्वतंत्रपणे झोपतात तेव्हा त्याला स्लीप डिव्होर्स म्हणतात. असे केल्याने झोपेची समस्या दूर होते. शिवाय वाद न झाल्याने सकाळी उठल्यावर सुद्धा फ्रेश वाटते. पण असा प्रकार करणं कितपत योग्य आहे? याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात?

स्लीप डिव्होर्स म्हणजे काय?

स्लीप डिव्होर्स तेव्हा होतो जेव्हा कपल्स एकत्र राहतात पण चांगली झोप मिळावी म्हणून वेगळ्या बेडरूममध्ये झोपणे पसंत करतात. परिस्थितीनुसार, स्लीप डिव्होर्स दीर्घकालीन किंवा तात्पुरता असू शकतो. यामध्ये केवळ झोपायला मिळणे हा एकच कळीचा मुद्दा असतो आणि यच मुद्द्यावर कपल्स झोपताना वेगळे होतात. बाकी गोष्टींचा त्यांचा या स्लीप डिव्होर्सशी थेट संबंध नसतो. ही एक नवीन संकल्पना आहे जी आजच्या पिढीत झपाट्याने वाढताना पहायला मिळते आहे.

योग्य की अयोग्य..

आपल्याला खरोखर स्लीप डिव्होर्सची गरज आहे का? तर त्याचे उत्तर आहे की कदाचित होय. आपल्या सर्वांना माहित आहे की निरोगी जीवनशैलीसाठी चांगली झोप खूप महत्वाची आहे. पण एका जोडीदाराच्या झोपण्याच्या काही सवयी दुसऱ्या जोडीदाराच्या झोपेला खराब करू शकतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या जोडीदाराच्या झोपण्याच्या सवयींमुळे तुम्ही झोपेशी तडजोड करत असाल तर स्लीप डिव्होर्स विचार करणे चुकीचे नाही. कारण झोपच नीट मिळाली नाही तर हळूहळू त्याचा पूर्ण परिणाम तुमच्या एकूण आयुष्यावर होऊ लागतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button