Mumbai

यशवंत नाट्य मंदिर मध्ये रंगणार सहावा जागतिक रंगकर्मी दिवस…!

यशवंत नाट्य मंदिर मध्ये रंगणार सहावा जागतिक रंगकर्मी दिवस…!

मिलिंद जाधव

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था मराठी नाटय कलाकार संघ.
गेली पाच वर्ष नाटयतपस्वी भालचंद्र पेंढारकर यांचा जन्मदिवस “जागतिक रंगकर्मी दिवस” म्हणून साजरा करीत असतो, गेल्या पाच वर्षात ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.मधुकर तोरडमल, किशोर प्रधान, शोभा प्रधान, गंगाराम गवाणकर आणि विक्रम गोखले यांचे सन्मान करून त्यांनी दिलेले संदेश प्रसारित करण्यात आले यंदाही कलाकार संघाच्या वतीने २५ नोव्हेंबर हा जागतिक रंगकर्मी दिवस सोहळा यशवंत नाटय मंदिर, माटुंगा येथे सायंकाळी ०५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे
यंदा सन्मान मूर्ती होण्याचा मान ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप प्रभावळकर यांना मिळाला आहे या सोहळ्यात दिलीप प्रभावळकर यांच्या कारकिर्दीला सलाम म्हणून त्यांच्या हसवा फसवी या नाटकातील काही प्रवेश सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री, विजय पटवर्धन, आणि योगिता पोफळे हे कलाकार सादर करणार आहेत, तर विघ्नेश जोशी हे दिलीप प्रभावळकर यांची प्रकट मुलाखत घेतील, कार्यक्रमाची सुरुवात नाटयपरंपरे नुसार ज्ञानेश पेंढारकर, निलाक्षी पेंढारकर हे नांदी सादर करून करतील, तसेच संपदा माने, औंकार प्रभुघाटे हे नाट्यगीते सादर करणार आहेत.
याशिवाय यंदा ज्या रंगकर्मींनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे व ज्या रंगकर्मींच्या कार्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही अशा काही निवडक रंगकर्मींचा सन्मान देखील या सोहळ्यात करण्यात येणार आहे, हा सोहळा सर्वांसाठी खुला असून पहिल्या पाच रांगा राखीव आहेत.हा सोहळा व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे, उपाध्यक्ष शरद पोंक्षे, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, कोषाध्यक्ष उमा बापट, सहकार्यवाह शिवाजी शिंदे, सहकोषाध्यक्ष विजय सूर्यवंशी, सदस्य सुनीता गोरे, शिरीष सुखटणकर, सावित्री हेगडे, आशा ज्ञाते, ऍड.देवेंद्र यादव, सल्लागार वंदना गुप्ते, सुबोध भावे, जितेंद्र जोशी आणि अर्चना नेवरेकर यांच्यावर आहे,अशी माहिती संघाचे सहकोषाध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी दिली.

धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे
(सिने नाट्य कलाकार , दिग्दर्शक , पत्रकार)
९०८२२९३८६७
८८७९८१०२९८

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button