Nashik

साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था आणण्याचे बळ श्रीराम शेटे यांनी दिले – खा.शरदचंद्रजी पवार

साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था आणण्याचे बळ श्रीराम शेटे यांनी दिले – खा.शरदचंद्रजी पवार

सुनील घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे भवितव्य अंधकारमय असताना दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याच्या माध्यमातून बंद पडलेल्या साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था आणण्याला बळ दिल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्रजी पवार यांनी खेडगाव येथे केले.
कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा, ना.नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार व मविप्र संस्थेचे कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय खेडगाव येथील नवीन इमारत उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
पवार यांनी श्रीराम शेटे हे जमिनीवर राहून काम करणारे नेते असून त्यांनी खऱ्या अर्थाने साखर कारखानदारीला बळ दिले असून त्यांचे आदर्शवत कामामुळे ते आज महाराष्ट्र राज्याचे साखर संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम करीत असताना राज्यातील साखर कारखानदारीचे नेतृत्व करत आहे.केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे अशक्य असून इथेनॉल हायड्रोजन गॅस निर्मिती प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे सांगितले.विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ य यांच्या निवडीवेली त्यांना ही जबाबदारी पेलवेल का ही कुजबुज होती मात्र त्यांनी पहिल्याच भाषणात आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची जाणीव करून दिली व ते योग्य काम करत आहे त्यांच्या या पदाचा सन्मान म्हणजे महाराष्ट्रातील आदिवासी जनतेच्या समस्याचे श्रीयुत पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यात नाशिक जिल्ह्यातील कर्मविरांचा मोठा वाटा आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे आपण नाव घेतो ते केवळ त्यांनी देशाला दिलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळेच. महात्मा फुले आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते आणि नाशिकमध्ये झालेले साहित्य संमेलन देखील विज्ञानाला वाहून दिले, हा फुले यांच्या कार्याचा गौरव आहे. शेतकर्यांच्या जीवनात आवश्यक बदल घडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. द्राक्ष, उस, डाळिंब, फुल, कांदा आदी पिकांसाठी चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करू. लवकर चित्र पालटेल, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील, प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो नाना आहिरे, चिटणीस डॉ सुनील ढिकले, आमदार दिलीपराव बनकर, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, नितीन पवार, हिरामण खोसकर,डॉ सुधीर तांबे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, माजी खासदार देविदास पिंगळे, जेष्ठ नेते भगीरथ शिंदे, पंढरीनाथ थोरे, रवींद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड,गणपत बाबा पाटील, विद्याताई पाटील,नानासाहेब बोरस्ते, मविप्र संस्थेचे संचालक भाऊसाहेब खातळे, उत्तमबाबा भालेराव, अशोक पवार, नाना महाले, प्रल्हाद गडाख, दिलीप पाटील, डॉ प्रशांत देवरे, डॉ जयंत पवार, रायभान काळे, हेमंत वाजे, डॉ विश्राम निकम, सचिन पिंगळे जि प सदस्य भास्कर भगरे सेवक संचालक प्रा नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, श्रीम नंदा सोनवणे, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ एस के शिंदे, प्रा नानासाहेब पाटील, डॉ काजळे, आदी सह मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री भुजबळ यांनी, श्रीराम शेटे यांच्या कार्याविषयी स्तुतीसुमने उधळताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यातील योगदानाचे आवर्जून कौतूक केले. ज्या कारखान्यावर हजारो शेतकरी, कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे, ती आस्थापना सुस्थितीत ठेवण्यासाठी मदत केली. बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी श्रीराम शेटे यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
मविप्र सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार म्हणाल्या, मविप्रच्या पाच इमारतींचे उदघाटन झाले आहे. अजून ३० इमारतींची उद्घाटने बाकी आहे. त्यासाठी शरद पवार यांना तीन महिन्यांनी पुन्हा नाशिकला यावे लागेल. त्यांनाही यायला आवडेल, असा विश्वास श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.संस्थेच्या विकास कामांची माहिती त्यानी यावेळी दिली.
सत्कारमूर्ती श्रीराम शेटे म्हणाले, शिक्षण झाल्यानंतर मी शेती व्यवसायाला लागलो. चिखल, माती तुडवत असताना शेतीतील अडचणी व शेतकर्यांच्या समस्या लक्षात आल्या. त्यानंतर माझे राजकारणात येणे झाले. ग्रामपंचायत, पंचायत समिती असा प्रवास करून आदिवासी, शेतकरी, गरजूंना मदत करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून रस्ते बांधण्यासाठी दिल्लीला पाठविलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर झाला. साहजिकच तालुक्यातील गावे एकमेकांना जोडली गेली. नंतरच्या काळात धरणांतील पाणी पोटचार्यांच्या माध्यमातून शेतात आणल्याने विविध पिके शेतकर्यांना घेता आली. शरद पवार यांच्यासमोर मांजरपाडा प्रकल्पाचा प्रश्न मांडताच तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिल्याचे सांगत पवार साहेबांचे नाशिक जिल्ह्यावरील प्रेम किती आहे, हे सांगितले.
– कादवा कारखाना निवडणुकीत तीनदा पराभव झाल्यानंतर मात्र मला सभासदांनी प्रचंड मतांनी निवडून दिले. कारखाना कर्जातून बाहेर काढण्यासाठी शरद पवार यांच्या नावाने पतसंस्थेची स्थापना केली अन् कारखाना सुस्थितीत सुरू झाल्याचे सांगत शरद पवार यांनी केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
केंद्राकडे पाठपुरावा करून इथेनाॅल निर्मितीचे धोरण मंजूर केल्यामुळे साखर कारखाने ऊर्जितावस्थेत राहण्यास मदत झाली.
– सभासदांनी आमच्याकडे ठेवी ठेवल्यामुळे कादवाला चांगले दिवस येत आहे. सभासदांना आम्ही टनामागे 300 रूपये जास्त देतो. शरद पवार न्याय देण्याचे काम करीत असल्याने कारखाने सुरू असल्याचे सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद देऊन मला माझा राजकीय प्रवास अजून सुकर झाला. कामकाजाच्या माध्यमातून संघटन मजबूत केले.
सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. अमृताचे थेंब ज्या भूमित पडले त्या भूमित श्रीरामाचा सत्कार होतोय, हे बघण्याचे भाग्य मला लाभले, ही समाधानाची बाब असल्याचे नमूद केले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी, शरद पवार उतारवयातही जे काम करीत आहे, ते कोणीही करू शकत नाही. श्रीराम शेटे यांनी तीनदा पराभव स्विकारला. मात्र, त्यांचा आदर्श घेऊनच मला पुढे राजकारणात यश मिळाल्याचा उल्लेख केला. एकदरा सिंचनप्रश्नी अधिकार्यांसोबत बैठक घेण्याची गळ यावेळी त्यांनी पवार यांना घातली. द्राक्ष उत्पादकांसाठी चांगल्या पॅकेजची घोषणा करण्याबरोबरच कर्जमाफीबाबत उर्वरित शेतकर्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मविप्र संस्थेचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पाटील यांनी मविप्र संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील कामकाजाची माहिती सांगून इमारती बांधकाम करून संस्थेच्या भौतिक सुविधेबरोबरच गुणात्मक विकास होत आहे. श्रीराम शेटे यांचा अमृतमहोत्सवी निमित्त त्यांच्या केलेल्या प्रामाणिक कामकाजाची माहिती सांगून राष्ट्रवादी पक्षाने जे आम्हाला व परिसराला मिळवून दिले त्याबद्दल ऋण व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मविप्र संस्थेचे अध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे यांनी सांगितले की मविप्र संस्था ही शैक्षणिक क्षेत्रात कामकाज करतांना बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्ती प्रमाणे कार्य करत असून कर्मवीरांनी आदर्श घालून दिलेल्या सूत्रानुसार मविप्र संस्थेचे कामकाज सुरू आहे.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व समाजगीत गायन करून गितमंच ने केली.
उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मविप्र चिटणीस डॉ सुनील ढिकले यांनी मानले.व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे सभापती ,उपसभापती ,संचालक, शेतकरी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.
फोटो- लोकनेते श्रीराम शेटे यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन प्रसंगी त्यांचा सत्कार करतांना खासदार शरदचंद्रजी पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, ना नरहरी झिरवाळ, श्रीम निलीमाताई पवार, दत्तात्रय पाटील, विद्याताई पाटील व मान्यवर

भाजप,शिवसेना व काँग्रेस नेत्यांचा राष्ट्वादी काँग्रेस मध्ये प्रवेश-
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गटातील युवा नेतृत्व व मागील काळात भाजपा च्या वतीने जिल्हा परिषदेची उमेदवारी करून दोन नंबर मते मिळविणारे तुकाराम जोंधळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
कोचरगाव गटाचे काँग्रेस चे जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, वैभव पाटील, वणारवाडी चे उपसरपंच दत्तू भाऊ भेरे,मोहाडी ग्रामपंचायत सदस्य किरण नाईक आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.

उत्तर महाराष्ट्रात मविप्र संस्थेचे कार्य गौरवास्पद – खा.पवार
शैक्षणिक क्षेत्रात उत्तर महाराष्ट्रात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कामकाज गौरवास्पद असून संस्थेच्या विकासाबरोबरच विदयार्थी यांचा गुणात्मक आलेख वाढत आहे.संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा ताई पवार, अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचे कामकाज आदर्श असल्याने संस्थेचा नावलौकिक वाढत आहे असेही प्रतिपादन खासदार शरदचंद्र पवार यांनी केले.

चौकट- शरदचंद्रजी पवार साहेब यांचा रांगोळीने तयार केलेली प्रतिमा आकर्षण –
कार्यक्रमस्थळी मविप्र संस्थेतील जनता विद्यालय सातपूर येथील कला शिक्षिका श्रीम, जोत्स्ना पाटील यांनी रांगोळीच्या वापर करून खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची हुबेहूब 4/6 ची प्रतिमा तयार केली होती ,ती सर्वांचे आकर्षण ठरली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button