शिर्डी

शिर्डीत मानव तस्करी होत असल्याचा संशय… गेल्या वर्षात 88 व्यक्ती गायब

शिर्डीत मानव तस्करी होत असल्याचा संशय… गेल्या वर्षात 88 व्यक्ती गायब

शिर्डी

शिर्डी हे अनेक लोकांसाठी श्रद्धनीय स्थान आहे दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. फक्त महाराष्ट्र तुनच नाही तर संपूर्ण भारतातून येथे भाविक भेट देत असतात.परंतु शिर्डी हे देव स्थान सुरक्षित आहे का?

अनेक अवैध धंदे येथे सुरू असतात.भाविकांच्या भावनेचा,श्रद्धेचा बाजार मांडला जातो.येथील ट्रस्टी मनमानी कारभार करतात.करोडो रुपयांची उलाढाल येथे होत असते.अनेक प्रकारचे रॅकेट येथे सुरू असतात त्यातच अजून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षभरात शिर्डीतून सुमारे ८८ भाविक महिला आणि तरुण बेपत्ता झाले आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बाब तेव्हा लक्षात आली जेव्हा मनोजकुमार प्रेमनारायण सोनी हे युवक सहकुटुंब ऑगस्ट २०१७ मध्ये शिर्डीला दर्शनाकरिता गेले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिर्डी संस्थानाच्या भोजनालय परिसरातून त्यांची पत्नी अचानक गायब झाली. त्यांनी पत्नीचा सगळीकडे शोध घेऊनही त्या कुठेही सापडल्या नाही म्हणून शेवटी सोनी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी देखील काही विशेष तपासच केला नाही.

सोनी यांनी स्वतः पुढाकार घेऊन माहितीच्या अधिकारात शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या वर्षभरात किती जण असे बेपत्ता झाले आहेत याची माहिती मिळवली तेव्हा ८८ जण गायब असल्याचा धक्कादायक आकडा समोर आला. तात्काळ सोनी यांनी अ‍ॅड. सुषांत व्ही. दिक्षीत यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात हेबीयस कॅरप्स याचिका दाखल केली. खंडपीठाने खटल्याचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने ८८ लोक कुठे गायब झाले हे शोधण्याचे शिर्डी पोलिसांना आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, “गायब झालेले लोक अनेक प्रकारे गायब झालेले असू शकतात पण मानव तस्करी आणि अवयव तस्करी या दोन शक्यता आधी आहेत.” या खटल्याची पुढील सुनावणी १० जानेवारी २०२० रोजी अपेक्षित आहे. मात्र तोवर शिर्डीला जाणाऱ्या भाविकांनी स्वतःची व परिजनांची काळजी घ्यावी असे आदेश आहेत.

Leave a Reply

Back to top button