पंढरपूर

शनिवारी श्री विठ्ठल अभियांत्रिकीत जपानच्या यारोकी इंडियाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होणार

शनिवारी श्री विठ्ठल अभियांत्रिकीत जपानच्या यारोकी इंडियाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होणार
जिल्ह्यातील ४0 शाळेतील विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन….

शनिवारी श्री विठ्ठल अभियांत्रिकीत जपानच्या यारोकी इंडियाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होणार

पंढरपूर- प्रतिनिधी रफिक अतार
दि.२८ सप्टेंबर रोजी  गोपाळपूर (ता. पंढरपूर )येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकीत टोकियो (जपान) येथील टोपान प्रिंटींग कंपनी लिमिटेडचा भाग असलेले ‘यारोकी इंडिया’ सॉफ्टवेअरचे उच्चस्तरीय अधिकारी सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी मधील जवळपास चाळीस शाळेतील विद्यार्थी आणि गणित शिक्षकांना मार्गदर्शन करणार असून लोट्स इंग्लिश स्कूल अंतर्गत हे शक्य झाले आहे. 
           पंढरपूर येथील श्री विठ्ठल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल हे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत आहे लोटस इंग्लिश स्कूलची स्थापना २०१० साली झाली असून स्थापनेपासून अवघ्या नऊ वर्षातच उंच भरारी घेऊन राज्यात आपले नाव शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उंचावले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवित असताना विद्यार्थ्यांना अभ्यासातील नवनवीन प्रकारच्या उपक्रमामुळे विविध विषयात गोडी निर्माण व्हावी म्हणून स्कूलने टोकीयो (जपान)च्या टोपान प्रिंटिंग कंपनी लिमिटेड या कंपनी समवेत त्यांच्या ‘यारोकी शैक्षणिक प्लॅटफॉर्मच्या पायलेट स्टडी करण्याबद्दल सामंजस्य करार शैक्षणिक वर्ष २०१७ साली झाला आहे. या पायलट स्टडीचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांची गणित विषयाची मनामध्ये असलेली भीती दूर करून सेल्फ लर्निंगद्वारे गणितातील गोडी निर्माण करण्यासाठी होईल आणि गणितावरील प्रभुत्व मिळवण्यासाठी होईल. शिक्षकांना वर्गात टॅबद्वारे मुलांना आधुनिक पद्धतीने व त्यांना समजेल या पद्धतीने शक्य होईल. त्याबरोबर प्रत्येक मुलाची प्रगती बघणे आणि त्यानुसार त्याला वैयक्तिक सल्ला देणे शक्य होणार आहे. या करारातील प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना जपानी पद्धतीने गणित शिकण्याची संधी मिळणार आहे. गणितातील प्रभुत्वामुळे जपानने आज जगात सर्वच क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय प्रगती केली आहे. याबद्दल सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की टोपानने निवडलेल्या शाळांमध्ये मुंबई वगळता उर्वरित भारतातून लोटस इंग्लिश स्कूल ही एकमेव शाळा आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ यावर्षी शाळेने इयत्ता चौथीच्या वर्गासाठी करार केला होता.या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून यावर्षी शैक्षणिक वर्ष २०१९-२० रोजी इयत्ता तिसरी व चौथी या दोन वर्गांचा समावेश केला आहे. या आधुनिक टॅबद्वारे गणित विषय शिकविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्या शनिवारी दि.२८ सप्टेंबर रोजी स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी साडेआठ वाजता टोपान प्रिंटींग कंपनी लिमिटेडचा भाग असलेले ‘यारोकी इंडीया’ सॉफ्टवेअरचे अनुराग गुप्ता यांच्यासह उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे आगमन होणार असून लोट्स इंग्लिश स्कूलसह जवळपास चाळीस शाळांमधील विद्यार्थी व गणित शिक्षकांना बहुमोल मार्गदर्शन होणार आहे. या टॅबद्वारे गणित शिकणे आता आणखी सोपे होणार आहे. 
या मार्गदर्शनामुळे लोट्सच्या विद्यार्थ्याना अधिक उर्जा आली असून अध्यक्ष बी. डी. रोंगे, उपाध्यक्ष एच एम. बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे, सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोट्स इंग्लिश स्कूल ही अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.  

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button