Nandurbar

दिशा’ समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

दिशा’ समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

फहिम शेख

नंदुरबार खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी संवेदनशिलतेने काम करावे, असे यावेळी खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले.

बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अशासकीय सदस्य कांतीलाल टाटीया, बबीताताई नाईक, डॉ.स्वप्नील बैसाणे, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.

डॉ.गावीत म्हणाल्या, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी देता येणे शक्य आहे. पहिल्या टप्प्यात तयार केलेल्या आराखड्यानुसार त्वरीत कामे पूर्ण करावी. ग्रामपंचायत स्तरावर माहिती घेऊन इतर गावांचा सविस्तर आराखडा तयार करावा. त्यात सर्व पाड्यांचा समावेश होईल असे पहावे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यास दुबार लाभ देण्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करावी. शहरी भागातील बेघर व्यक्तींना घरकूल देण्यासाठी जागेचा शोध घ्यावा. स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 अंतर्गत सर्वेक्षण बिनचूक होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरीत करण्यात यावी. कामे वेळेवर न करणाऱ्या कंत्राटदारांवर आवश्यक कारवाई करावी. मेढाने वीजजोडणी दिलेल्या प्रत्येक घराची पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी डॉ.टाटीया यांनी लिहिलेल्या ‘पेसाचा वसा’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पेसा कायद्याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button