Peth

झारखंडच्या बुरुगेलिकेरा हत्याकांडाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष यांचेकडे सुपूर्त – खा.डॉ.भारती पवार

झारखंडच्या बुरुगेलिकेरा हत्याकांडाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष यांचेकडे सुपूर्त – खा.डॉ.भारती पवार

प्रतिनिधी :-विजय देशमुख

झारखंडच्या रांची चाईबासा मधील पश्चिम सिंहभुम जिल्ह्यातील बुरुगेलिकेरामध्ये झालेल्या भयंकर हत्याकांडात सात आदिवासींचे धडा वेगळे शिर करून निर्घृण हत्या केली, त्यामुळे संपूर्ण भारतभरात जी दहशत तयार केली गेली होती या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सहा खासदारांची संसदीय कमिटी नेमून त्यांना येत्या सात दिवसांत घडलेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगून घटना स्थळी चौकशी करण्यास पाठवली होते.
त्यानुसार कमिटीत महाराष्ट्रातील खासदार डॉ.भारती प्रविण पवार, गुजरात चे खा. जसवंत सिंह भाभोर, छत्तीसगडच्या खा.गोमती साय, झारखंडचे खा. समीर उरांव, पश्चिम बंगालचे ख. जोन बार्ला आणि झारखंडचे माजी मंत्री नीलकंठ मुंडा यांचा समावेश होता.

त्यानुषंगाने घटना स्थळी जाऊन घडलेल्या संपूर्ण परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन इतर पाच सदस्यांसमवेत खा.डॉ.भारती पवार यांनी झारखंडच्या रांची चाईबासा बुरुगेलिकेरा येथील हत्याकांडाची सखोल चौकशी करत स्थानिक आदिवासी, पोलीस आणि आर्मिशी संवाद साधत परिस्थितीत जाणून घेऊन घटना स्थळी भेट दिली प्रसंगी निर्घृण हत्याकांड विरोधी त्याठिकाणी ठिय्या आंदोलन देखील करणेत आले. त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला सखोल चौकशी अहवाल हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षांनी संपूर्ण परिस्थितीत समजावून घेतली आणि सदर ठिकाणच्या भयंकर परिस्थितीबाबत चर्चा करत अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता सक्षम यंत्रणा राबविण्याची देखील कमिटीच्या खासदार सदस्यांकडून दिल्ली येथे मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Back to top button