Nashik

आदर्श कामकाजाबद्दल रेशन दुकानदार गणपत डोळसे पाटील यांचा सन्मान

आदर्श कामकाजाबद्दल रेशन दुकानदार गणपत डोळसे पाटील यांचा सन्मान

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : महाराष्ट शासनाच्या आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली (AEPDS) चा शासनाच्या अतिशय महत्वकांक्षी प्रकल्पाअंतर्गत ई पॉस (EPOS) मशिनद्वारे माहे जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० चा कालावधीत दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील रेशन दुकानदार गणपत डोळसे पाटील यांनी नियमित १०० टक्के धान्याचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे.
कोव्हिड- १९ च्या पार्श्वभुमीवर शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या धान्याचे देखील वाटप लाभार्थ्यांना पुर्ण केलेले आहे. तसेच आपल्या दुकानाचे आधार सिडींगचे कामकाज, आवश्यक नोंद वह्या व अद्ययावत दप्तर उत्कृष्टपणे ठेवण्यात आलेले आहे.
त्यांच्या या उत्कृष्ट कामकाजाबद्दल त्यांचे नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
फोटो- कोविड काळात १०० टक्के धान्य वाटप करणारे ढकांबे येथील रेशनदुकानदार गणपत डोळसे पाटील यांचा सन्मान करतांना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ अरविंद नरसीकर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button