रावेर

रावेरला ईद मिलाद मिरवणूक उत्साहात संपन्न

रावेरला ईद मिलाद मिरवणूक उत्साहात संपन्न

रावेर विलास ताठे

ईद-ए-मिलादुन्नबी पैगंबर हजरत मोहंमद यांच्या जन्मदिवसानिमित्ताने सालाबादाप्रमाणेमिरवणूक काढण्यात आली. येथील गौसिया मस्जिद फत्तेहनगर, हुसैनी मस्जिद फुकटपुरा, इमाम वाडा मस्जिद, नागझिरीमस्जिद, कसाई वाडा मस्जिद वगैरे हुन प्रवचन करतांना मण्यारवाडा मस्जिद जवळ पोहोचली तसेच मण्यारवाडा मस्जिद पासुनमिरवणूक शिवाजी चौक, मोमिन वाडा,भोई वाडा, भागातुन गांधी चौकातुन मेन रोड नाला, चावडी रोड, कोतवाल वाडा व डॉ.आठवलेच्या घरापासुन पाराचा गणपती,धोबी लोकांच्या घरापासुन मण्यारवाडामस्जिद जवळ येवून या ठिकाणी हीमिरवणूक विसर्जित झाली. मिरवणूकीत युवक जेष्ठ नागरिक व लहान बालके सहभागी झाले होते यावेळी खाऊ वाटप करण्यात आला. व ठिकठिकाणी सजावट करण्यात आली होती. ईद मिलाद निमित्त एक मेकांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी आयोजीत कार्यक्रामच्या अध्यक्षस्थानी मौलाना गयासुद्दीन होते. या वेळी मौलाना नजर अशरफ, मौलाना हसीबुर रहेमान, मौलाना रईस, मौलाना मोइन तसेच शहरातील मशीदीतील सर्व मौलाना उपस्थित होते.

शहरातील विविधमान्यवरांमध्ये नगराध्यक्ष दारामोहम्मद, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगले, पोलीस निरीक्षक रामदास वकोडे, नगरसेवक आसिफमोहम्मद, शे.सादीक, असदुल्ला खान, योगेश गजरे, गयास शेख, युसुफ खान, अब्दुल मुत्तलीब, गयासुद्दीन काजी, डॉ. नुरमोहम्मद नुरी, कालु पहेलवान, हाफीज मो.अखतर, हाजी मुखतार शे.मोती, फिरोज रोज खान (फोजी), सादीक शेख हमजा तसेच शहरातील हिंदुमुस्लिम बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते. पोलिस तसेच पोलिस कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button