Nashik

ट्रायबल फोरम नाशिक जिल्हाध्यक्षपदी रतन चौधरी

ट्रायबल फोरम नाशिक जिल्हाध्यक्षपदी रतन चौधरी

नाशिक – आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवून समाजासाठी नेहमीच धावून येणारे रतन चौधरी यांची ट्रायबल फोरम नाशिक जिल्हाअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम यांनी केली आहे.
ट्रायबल फोरम आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करून सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे. वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कॅडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. रतन चौधरी यांची ट्रायबल फोरम नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button