Maharashtra

मातृशोक होऊनही नागरिकांच्या सुरक्षेसाठी रणांगणात उतरला हा अवलिया

मातृशोक होऊनही नागरिकांच्या सुरक्षेसाठी रणांगणात उतरला हा अवलिया

प्रतिनिधी सुनिल घुमरे

दिंडोरी शहरातील प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक *श्री तुषार मधुकर वाघमारे* यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. मातृशोक होऊनही घरी न थांबता प्रभागातील नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या नगरसेवकाचे नागरिक तोंडभरून कौतुक करत आहेत.
नेहमीच अभिनव कल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या या अवलियाने पुन्हा एकदा मनापासून पुढाकार घेऊन शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत त्यांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे व संरक्षण किट स्वखर्चाने ऊपलब्ध करून दिली. त्याच बरोबर प्रभाग क्रमांक ११ मधील प्रत्येक कुटुंब व त्यातील प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी सुरक्षेचे सर्व शासकीय नियम पाळून व सोशल डिस्टंसिंग चे पालन करत प्रत्येकाच्या घरी जाऊन सुरक्षिततेसाठी त्यांची तपासणी व आवश्यकता असल्यास मोफत प्राथमिक औषधोपचार उपलब्ध करून दिले. आरोग्य विभागातर्फे राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणात स्वयंसेवी डॉक्टर दांपत्य *डॉ.श्री गणेश बंदसोडे* व *डॉ.सौ. धनश्री बंदसोडे* यांच्या सहाय्याने आरोग्य विभागाच्या ‘ *आशा*’ ताई *सौ. रंजना गांगुर्डे व सौ. कल्पना पगारे* तसेच अंगणवाडी सेविका *सौ. कडलग व सौ. सोमवंशी* यांच्या टिमने हे सर्वेक्षण उत्तमरित्या पुर्ण केले व त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळाला त्यासाठीचे योग्य मार्गदर्शन तालुका वैद्यकीय अधिकारी *डॉ. सुचित कोशिरे* व नगरपंचायत मुख्याधिकारी *डॉ.श्री मयुर पाटिल* व गटनेते *श्री प्रमोदशेठ देशमुख* यांनी केले.नगरसेवक *तुषार वाघमारे* यांनी केवळ वैद्यकीय साहीत्य व संसाधनेच उपलब्ध करून दिली नाही तर स्वत: सर्व सुरक्षेची काळजी घेऊन सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी कोरोनाबद्दल प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकांचे वाटप केले व सोबत नागरिकांना त्यांची दररोज *travel history* ची नोंद ठेवण्यासाठी चार्ट उपलब्ध करून दिलेत व त्याचे महत्त्वही पटवून दिले. *Covid 19* च्या या वैश्विक संकटाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. हे सर्व नियोजन अभ्यासपूर्वक पद्धतीने केल्याने अतिशय प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी झाली. याव्यतिरिक्त व लॉकडाऊन काळात अनेक जनजागृती प्रबोधनात्मक स्पर्धा घरबसल्या आयोजित करुन वेळेचा सुयोग्य वापर तसेच प्रबोधन करतांना *what’s app ‘कोरोना’रांगोळी, मेहंदी, चारोळी- उखाणा लेखन, चित्रकला* स्पर्धा भरवून अनेक पारितोषिके स्वखर्चाने ठेवलीत. त्या स्पर्धांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर आणि ऊत्कृष्ठ नियोजनाचे उत्तम उदाहरण नगरसेवक *तुषार वाघमारे* यांनी दाखवून दिले. गोरगरीब व गरजूंसाठी फूड पॅकेट वाटप तसेच अनेक गरजूंना जिवनावश्यक वस्तूंसह किराणा व भाजीपाला वाटप केले. प्रभागातील नागरिकांनी घरीच रहावे यासाठी घरपोच भाजीपाला संकल्पना सर्वप्रथम राबवली. संपुर्ण प्रभागात जंतुनाशक फवारणी करवून घेतली . प्रभागातील नागरिकांनाच आपलं कुटुंब मानून व्यक्तिगत पातळीवर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरत प्रयत्न सुरुच ठेवले. सद्य परिस्थितीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतांनाही… सामाजिक सेवेचे व्रत घेतलेल्या या अवलियाने अनेक कुटुंबांचे आशिर्वाद मिळवलेत यात तीळमात्र शंका नाही.

– *गणेश बोराडे , निर्मला विहार,.*
व *सर्व नागरिक प्रभाग क्रमांक ११ दिंडोरी*.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button