Jalgaon

पोलीस कर्मचऱ्याचे प्रताप…रक्षकच बनला भक्षक…!महिलांना अश्लील मेसेज पाठवत होता.! 29 मोबाईल व 23 सिमकार्ड पोलिसाच्या घरातून जप्त.!

पोलीस कर्मचऱ्याचे प्रताप…महिलांना अश्लील मेसेज पाठवत होता.! 29 मोबाईल व 23 सिमकार्ड पोलिसाच्या घरातून जप्त.!

जळगाव जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा एक पोलीस अमलदाराचे कारनामे समोर आले आहेत.महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील मॅसेज पाठवत होता त्यामुळे संबंधित महिला पोलिसांनी सायबर पोलिसात तक्रार केल्यानंतर सदर प्रकार उघडीस आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील कर्मचारी हा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक महिला पोलिसांना सामाजिक माध्यमातून अश्लील मॅसेज व टेक्स्ट मेसेज पाठवत होता. अनेक महिला पोलीस त्याच्या त्रासाला कंटाळल्या होत्या. त्या त्रासाला कंटाळून संबंधित काही महिला पोलिसांनी सायबर पोलीस ठाणे जळगाव येथे धाव घेतली होती. याबाबत चौकशी होऊन धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. व त्याला अटकही करण्यात आली व नंतर संबंधित पोलिसाच्या घरावर छापा टाकला असून त्याच्या घरात तब्बल 29 मोबाईल व 23 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. म्हणून हा पोलीस एवढ्या मोबाईल व सिमकार्डच्या माध्यमातून काय करीत होता असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान त्या पोलीस कर्मचऱ्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांनतर आता त्यांना नाशिक पोलिसांनी देखील एका गुन्ह्यात अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित लेख

Back to top button