Nashik

शेतकरी पंचायत” च्या मागणीला वीज वितरण कंपनीचा सकारात्मक प्रतिसाद,ठोस आश्वासनानंतर आंदोलन स्थगित.

शेतकरी पंचायत” च्या मागणीला वीज वितरण कंपनीचा सकारात्मक प्रतिसाद,ठोस आश्वासनानंतर आंदोलन स्थगित.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : येवला तालुक्यातील शेती पंपांसाठी महावितरण कंपनीच्या २०२० च्या नव्या योजनेमध्ये बसवून येत्या महिन्याभरात अतिभारीत रोहिञ बसवून साताळी गाव परिसरातील शेतकर्यांचा वीजेचा प्रश्न कायमचा मार्गी लावणार असल्याचे ठोस आश्वासन महावितरण कंपनीचे येवला ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर्.एम्. पाटील यांनी आज दिले.
राष्ट्र सेवा दल प्रणित शेतकरी पंचायत च्या साताळी येथील शेतकरी कार्यकर्त्यांनी आज उपकार्यकारी अभियंता पाटील यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले,समक्ष चर्चा केली त्यावेळी, त्यांनी हे ठोस आश्वासन देऊन शेतकर्यांकडून शक्य तेवढ्या लवकर थकीत वीज बील भरण्याचाही शब्द घेण्यास ते विसरले नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून येवला तालुक्यातील साताळी,चिचोंडी, भिंगारे,महालखेडा,नेऊरगाव,निमगाव मढ,आदी गावांमध्ये महावितरणचा वीज पुरवठा अनियमित,कमी दाबाने आणि बेभरोशाचा होत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अचानक डी पी जळाल्याचे प्रकार वाढल्यामुळे पंधरा दिवस वीजच नसल्याचा कटू अनुभव शेतकरी वर्षभरात अनेकदा घेत होते.एरव्ही देखील पाच पाच तास वीज गायब राहण्याचे प्रकार तर बर्याच वेळा शेतकरी सहन करतात.
वरील गावांपैकी सर्वच गावांमध्ये कमीत कमी ३/४ डी पी नव्याने बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी बोलताना शेतकर्यांनी करताच उपअभियंता पाटील म्हणाले आकडे बंद करुन थकीत वीज बील भरणा व्हायला हवा. त्यावेळी भिकाभाऊ सोनावणे या शेतकर्यांने कालच थकीत ४२०००/- हजार रुपये भरणा केल्याची पावती दाखवताच उपअभियंता पाटील यांनी समाधान व्यक्त केले, आणि शेतकर्यांनी असा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद देत शक्य तेवढ्या लवकर नवीन रोहिञ बसवून देत असल्याचे जाहीर केले. त्याच बरोबर साताळी गावातील दलित-आदिवासींनी मार्च महिन्यात जातीचे दाखले देऊनही चिचोंडीच्या वीज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता गीते यांचेकडे गेल्या सात महिन्यापासून देऊनही गीते यांनी सातत्याने या अत्यंत महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यावेळी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाटील यांनी माञ सदर रोहिञ समाजकल्याण खात्याकडील विशेष अनुदानातून लवकरात लवकर बसवून देण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगून हेही काम मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट केले.
मध्यंतरी या परिस्थितील सर्व गावांमध्ये कार्यकारी उप अभियंता पाटील यांनी सर्व संबंधित इंजिनिअर,वायरमन आदी लव्याजम्यासह येऊन शेतकर्यांचे मेळावे घेतले होते,त्यावेळी शेतकर्यांनी थकीत वीज बील नियमितपणे भरावे वीज वितरण कंपनी तुम्ही म्हणाल त्या सुविधा द्यायला तयार असल्याचे जाहीर केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली उपकार्यकारी अभियंता पाटील यांना भेटलेल्या शेतकर्यांना या भयंकर परिस्थितीत दिलासा ठोस आश्वासनांचा दिलासा मिळाल्यामुळे शिष्टमंडळात असलेल्या सर्वांनी आनंद व्यक्त केला.याप्रसंगी साताळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुनंदा पुंजाराम काळे,माजी सरपंच मच्छिंद्र पा.काळे,चेअरमन भाऊसाहेब कोकाटे,दिलीपराव काळे,भिकाभाऊ सोनावणे, भाऊसाहेब जगताप,उपसरपंच गणेश कोकाटे,पी.के.काळे,सुखदेव काळे,कृष्णा कोकाटे, परशराम कोकाटे,संजय कोकाटे, दादाभाऊ सोनावणे, भाऊसाहेब काळे, अमोल सोनावणे,ज्ञानेश्वर मोरे, बबनराव कोकाटे,संजय सोनावणे, राजेंद्र कोकाटे, नितीन कोकाटे, बाळासाहेब कोकाटे, नारायण बारे, साहेबराव कोकाटे आदी शेतकरी सहभागी होते.

संबंधित लेख

Back to top button