Mumbai

Politics: कोणाला कोणतं “खातं” मिळणार संभाव्य यादी आली समोर…

Politics: कोणाला कोणतं “खातं” मिळणार संभाव्य यादी आली समोर…

मुंबई राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासह एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, त्यापूर्वीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.

अजित पवार यांच्या गटाला मिळणाऱ्या खात्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. अजित पवार यांना महसूल मंत्री खातं, दिलीप वळसे पाटील यांना सांस्कृतिक आणि कृषि खातं मिळणार असल्याची माहिती आहे. हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्यांक, कामगार मंत्रीपद, तर छगन भुजबळ यांना ओबीसी आणि बहुजन विकास खातं, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय खातं मिळणार असल्याची संभाव्य यादी समोर आली आहे.

अजित पवार यांनी रविवारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

शपथ घेतल्यानंतर आमदारांकडे कोणतं पद जाणार? अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार? अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपकडील खाते मिळणार की शिंदे गटाच्या खात्यांनाही डच्चू मिळणार? ही चर्चा जोरदार रंगली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button