Jalgaon

भारतीय विद्यार्थी मोर्चा जळगाव जिल्हा युनिटचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास दणका

भारतीय विद्यार्थी मोर्चा जळगाव जिल्हा युनिटचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास दणका

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आंबेडकर विचारधारा” हा विषय पोष्ट ग्रॅज्युएशन पर्यंत समाविष्ट करण्यात आला आहे.
परंतु या विषयात ज्यांना पी.एच.डी. करावयाची आहे त्यांना PET ही परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य व आवश्यक आहे.
विद्यापीठाच्या website वर हा विषयच नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना पी.एच.डी.करावयाची आहे.त्यांना ही परीक्षाच देता येणार नाही.यामुळे या अन्यायाविरोधात “भारतीय विद्यार्थी मोर्चा” ने विद्यापीठात मा.मुकेश सावकारे (जळगाव जिल्हा अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा):यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन करुन म.कुलगुरुंना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात भारतीय विद्यार्थी मोर्चाचे सतिष बि-हाडे,अक्षय बाविस्कर,विशाल बैसाणे,दिपाली पेंढारकर,मयुर साळवे, जितेंद्र वानखेडे,सुषमा पवार, कैलास पाटील,विजयेंद्र पालवे,नितीन अहिरे,राहुल सपकाळे,महेश बनसोडे,शुभम अहिरे,विशाल अहिरराव,विकी सपकाळे,देवानंद निकम,सुकलाल पेंढारकर ,सुमित्र अहिरे आदि कार्यकर्ते व भारतीय विद्यार्थी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.*
*मा.कुलगुरु वायुनंदन यांना दिपाली पेंढारकर,सुषमा पवार,कैलास पाटील, जितेंद्र वानखेडे, विजयेंद्र पालवे व सुमित्र अहिरे यांनी निवेदन दिले.

भारतीय विद्यार्थी मोर्चा ची मागणी मान्य न झाल्यास २७ ऑक्टोबर रोजी विद्यापीठात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुकेश सावकारे यांनी दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button