Ahamdanagar

वडुलेखुर्द येथे स्व.ना.गोपीनाथ मुंडे यांच्या पुंण्यतीथी निमित्ताने लोकवर्गणीतून कानिफनाथ मंदिर परिसरात सुशोभीकरणाचा शुभारंभ संपन्न

वडुलेखुर्द येथे स्व.ना.गोपीनाथ मुंडे यांच्या पुंण्यतीथी निमित्ताने लोकवर्गणीतून कानिफनाथ मंदिर परिसरात सुशोभीकरणाचा शुभारंभ संपन्न

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वडुलेखुर्द शिवारातील कानिफनाथ मंदिर परिसरात लोकवर्गणीतून सुशोभीकरणाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.मोहनराव आव्हाड सर तर प्रमुख पाहुणे म्हणून निव्रुत्त कर्नल डॉ. सर्जेराव नागरे हे होते. वडुलेखुर्द गावातील युवा कार्यकर्ते आदिनाथ आव्हाड सर,संदिप आव्हाड, अनिल आव्हाड सर,विकास आव्हाड, रवींद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतुन व क्रुष्णा आव्हाड, कुमार रणमले यांच्या उदार दात्रुत्वातुन आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकनेते स्व.ना.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुंण्यतीथीचे औचित्य साधुन चैतन्य कानिफनाथ मंदिर परिसरात सुशोभीकरण, आणि वालकंपाउंडच्या कामाचे भुमिपुजन प्रमुख पाहुणे निव्रुत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. सर्जेराव नागरे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.कानिफनाथ मंदिर हे या परिसरातील भाविकांचे श्रद्धा स्थान आहे.मढीला जाण्या अगोदरच्या काळात कानिफनाथांचे या परिसरात वास्तव्य होते म्हणून मढीच्या यात्रेच्या अगोदर या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते ही आख्यायिका आहे. या कार्यक्रमासाठी अमोल आव्हाड, कानिफनाथ आव्हाड, मेजर कैलास आव्हाड, मेजर भाउसाहेब आव्हाड, माजी सरपंच सुरेश आव्हाड, पोपट पाखरे,घनश्याम आव्हाड, मल्हारी आव्हाड, मनोज बोरा,साईनाथ आव्हाड,विक्रम आव्हाड, दिलिप आव्हाड, आकाश आव्हाड ,जालिंदर आव्हाड, बापुसाहेब आव्हाड यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मंदिर परिसर पर्यटकांसाठी प्रसिद्ध झाला पाहिजे अशी ग्रामस्थांची ईच्छा आहे. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button