Nandurbar

पोलीस भरती लेखी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

पोलीस भरती लेखी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

नंदुरबार फहिम शेख

नंदुरबार, दि. 10 नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत घेण्यात येणारी पोलीस भरती लेखी परीक्षा 2019 रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे. कमला नेहरु कन्या विद्यालय, नंदुरबार, यशवंत विद्यालय, नंदुरबार, श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार, डी. आर. हायस्कुल, नंदुरबार, डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार, एस.ए. मिशन हायस्कुल, नंदुरबार, जी. टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार, ॲग्लो उर्दु हायस्कूल, नंदुरबार, पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार, एकलव्य हायस्कूल, नंदुरबार, पोद्यार इंटरनॅशनल स्कूल, नंदुरबार अशा नंदुरबार येथील 11 केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस. टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button