Ausa

निलंग्याहुन-अकोला जाणाऱ्या बसच्या बस चालकाचा ताबा सुटून बस ट्रकचा अपघात, उमरगा -लातूर राज्य महामार्गावरील वाघोली पाटीजवळ घडला अपघात अपघातात एक प्रवाशाचा मृत्यू ,तर तेरा प्रवासी जखमी

निलंग्याहुन-अकोला जाणाऱ्या बसच्या
बस चालकाचा ताबा सुटून बस ट्रकचा अपघात,
उमरगा -लातूर राज्य महामार्गावरील वाघोली पाटीजवळ घडला अपघात अपघातात एक प्रवाशाचा मृत्यू ,तर तेरा प्रवासी जखमी

प्रशांत नेटके

औसा : दिनांक 10 वार रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निलंग्याहुन अकोला जाणाऱ्या निलंगा आगाराची बस 14 प्रवासी घेऊन अकोल्याकडे जात होती.बस (क्रमांक -MH20BL 3973) चा आणि अशोक लीयलँड कंपनीच्या ( क्रमांक – KA 56 2595) या ट्रकची लातूर उमरगा राज्यमहामार्गावरील वाघोलीपाटी (ता औसा) नजीक सकाळी दहा वाजता अपघात झाला.वाघोली पाटी जवळ बस व ट्रक एकमेकांना जोरदार घासली त्यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बस रस्त्याच्या कडेला पलटली .त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून
बाकी जखमी प्रवाशांना लातूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.घटनास्थळी येऊन महसूल ,पोलीस व एसटी महामंडळाचे अधिकारी यांनी पाहणी केली.
यावेळी एसटी महामंडळाचे अजय गायकवाड,ए डब्लू एस होळकर,डी वाय एम ई जाधव,वाहतूक नियंत्रक एस एस परिहार या सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.पुढील कार्यवाहीसाठी औसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button