Mumbai

ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवीन निर्बन्ध..!आरोग्य मंत्रालय ची घोषणा

ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवीन निर्बन्ध..!आरोग्य मंत्रालय ची घोषणा

करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण केलं असताना गुरुवारी केंद्र सरकारने दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याची माहिती दिली. यामुळे ओमायक्रॉनचा प्रवेश भारतात झाला आहे. तर आज एकूण 25 रुग्ण बाधित आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व चाचण्या घेतल्या जात आहेत.ओमायक्रॉनचे रुग्ण जरी आढळले असले तरी लोकांनी भयभीत न होता करोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलं आहे. करोना नियमांचे पालन करावे आणि गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. तसेच लसीकरण वाढवावे, असेही केंद्रीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.जर काळजी नाही घेतली तर नवीन निर्बन्ध लागू करावे लागतील असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

यादरम्यान महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button