Jalgaon

नाथाभाऊंचे मानसिक संतुलन बिघडले..! आमदार गिरीश महाजनांचा पलटवार..!

नाथाभाऊंचे मानसिक संतुलन बिघडले..! आमदार गिरीश महाजनांचा पलटवार..!

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे आता मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणून ते कुणावरही काहीही बेछूट आरोप करीत आहेत असे प्रत्युत्तर देत आज आमदार गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंनी त्यांचे सत्ताधारी पक्षातील वजन वापरून माझ्या सगळ्या मालमत्तांची चौकशी करावी असे आव्हान दिले

शिक्षकाच्या मुलाची २० ते २५ वर्षात हजार — बाराशे कोटींची मालमत्ता कशी ? असा आरोप काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला होता. त्याला प्रतिउत्तर देतांनाव आज आमदार गिरीश महाजन म्हणाले की अनेक दिवसांपासून खडसे बेछूट आरोप करीत आहेत त्यांचा इशारा नेहमी जामनेरकडे असतो माझ्याविरोधात पुण्यात दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हासुद्धा त्यांच्या अशाच केविलवाण्या प्रयत्नांचा भाग आहे त्यामुळे मला आता त्यांची कीव येते आहे कारण आता त्यांचे कुणी ऐकत नाही त्यामुळे ते आता वेड लागल्यासारखे बोलत आहेत मी म्हणतो की तुम्ही आता सत्ताधारी पक्षात आहात त्यामुळे राज्य सरकारला सांगून माझ्या मालमत्तांचीही चौकशी करा त्यांचे तर माझ्यावर मोक्का लावण्याचेही प्रयत्न सुरु आहेत त्यांनी त्यांना वाटेल ती चौकशी करावी मी पण विचारतो की त्यांनी त्यांच्या मालमत्तेचा हिशोब जाहीरपणे द्यावा केवळ राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात दुचाकी आणि जीपगाडीत रॉकेल टाकून आणि शेतीच्या उत्पन्नातून त्यांनी एवढी मालमत्ता जमवली आहे का ?

विधासभेत राणा भीमदेवी थाटात त्यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता इकडे तिकडे न फिरता ३ –३ वेळा कोरोना होऊ देण्यापेक्षा ईडीच्या चौकशीपुढे उभे राहावे तुमची आणि माझी पण चौकशी होऊन जाऊ द्या आपण स्वच्छ आहोत हे दाखवण्यासाठी कुणावरही काहीही आरोप करू नयेत माझ्याकडे आता ३० ते ३२ एकर शेती आहे तिचे आजचे भाव पहा त्यांच्या ईडी कडून सुरु असलेल्या चौकशीशी माझा संबंध नाही मी एवढा मोठा नेता नाही की माझ्या सांगण्यावरून ईडीने त्यांची चौकशी करावी बी एच आर घोटाळ्याबद्दल मी तिकडे केले म्हणून इकडे माझे असे झाले असे त्यांच्या म्हणण्यात काहीही अर्थ नाही या घोटाळ्यातील आरोपी आजही तुरुंगात आहेत जवळपास १५ संचालक आत आहेत त्यात माझा संबंध काय ?

खडसे यांनी ईडीपुढे आपले निर्दोषत्व सिद्ध करावे मी ३ महिने माझ्या मतदारसंघात गेलो नव्हतो तरी मताधिक्ययाने निवडून आलो खडसे यांनी आपले आणि आपल्या मुलीचे मताधिक्य पाहावे आपल्या मतदारसंघातील परिस्थिती पाहावी तुम्ही स्वतःला विकासपुरुष म्हणवता , मग तुमच्या मतदारसंघात दुर्दशा का? बऱ्याच वेळा ते आमदार चंद्रकांत पाटलांवरही शेलक्या शब्दात टीका करतात त्यांनी हे सोडून द्यावे तुम्ही जर स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील म्हणवता तर आधी आपली आपल्या मतदारसंघातील मिळालेली मते पाहावीत त्यांची मानसिकता आता दिवसेंदिवस खराब होत आहे त्यांना आता मानसोपचार तज्ज्ञाच्या उपचारांची गरज आहे विकासाच्या मुद्द्यावर जामनेर , मुक्ताईनगर आणि बोदवडची परिस्थिती पहा काय उजेड पाडलाय त्यांनी ? कामे झाली असती तर त्यांची मुलगी पडली नसती कोथळीची ७ सदस्यांची ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात नाही त्यातून ते प्रत्येकाला दमदाटी करतात आपल्याला त्यांच्या बोलण्याचा राग येत नाही पण त्यांच्या बोलण्याची कीव येते नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळाबद्दल माझे सहकारी असलेल्या ३१ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला ५ लाखांच्या खंडणी वसुलीचा हा गुन्हा आहे त्या चुकीच्या गुन्ह्यासारखेच त्यांचे सीडीबद्दलचे विधान फक्त भंपकपणाचं आहे मी त्यावर काय बोलू ? चोपड्याच्या तुमच्या व्याह्यांची पतसंस्था बुडाली तेंव्हा तुम्ही मंत्री होते आणि ठेवीदार लोक तुम्हाला भेटायला आले तेंव्हा त्यांना तुम्ही मला विचारून पैसे ठेवलेत का ? असा प्रश्न विचारला होता मग आता बी एच आर पतसंस्थेबद्दल तुम्हाला का लोकांच्या त्रासाचा पुळका आला ? हे पण सांगा आता राष्ट्रवादीत तुमच्या शब्दाला वजन आहे तर ते वापरून त्या लोकांच्या हिताचाही विचार करा असेही आमदार गिरीश महाजन म्हणाले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button