Nashik

स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी ११ ऑगस्ट ते 17 ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान श्री पंकज पवार सो

स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी ११ ऑगस्ट ते 17 ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान श्री पंकज पवार सो

सुनिल घुमरे नासिक दिंडोरी प्रतिनिधी

भारत सरकारच्या वतीने आगामी काळात येणाऱ्या 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाला 75वर्ष पुर्ण होत असलेने जनतेला स्वातंत्र्य लढ्याच्या सकृतींची आठवण राहण्यासाठी व देशभक्तीचे भावना जागृत होणे दृष्टिकोनातून कायम रुस्वरूपी जनमानसात ध्वजाविषयी व राष्ट्राविषयी तळमळ असावी या दृष्टिकोनातून इतिहासाचे अभिमान पूरक स्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवाचे अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे सदरचे अभियान आपल्या तालुक्यातही यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून दिंडोरीचे तहसीलदार श्री पंकज पवार सो यांच्या अध्यक्षते खाली आज दिंडोरी तहसील कार्यालयात सदरचे अभियान यशस्वी करण्याच्या अनुषंगाने सहविचार व नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस गटविकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी मुख्याधिकारी दिंडोरी नगरपंचायत तालुका कृषी अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी महिला व बालविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी उप कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग एक व दोन क्रमांक निवासी नायब तहसीलदार इत्यादींच सदर बैठकीस तालुका प्रशासनाने बोलावलेले प्रशासकीय अधिकारी हजर होते यात स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायकांना तसेच क्रांतिकारकांचे त्यांच्या त्यागाची आठवण ठेवून त्यांचे स्मरण करून देशभक्तीच्या भावनेने दिंडोरी तालुक्यातील जनतेने प्रेरित होऊन आपापल्या गावात घरोघरी वाड्यावस्तीयांवर स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृति तेवत ठेवण्यासाठी हर घर तिरंगा हे अभियान राबवून या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी व प्रशासकीय अधिकारी यांनी यशस्वीपणे भाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे असे आव्हान दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार श्री पंकज पवार यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button