Nandurbar

गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाच्या आत मोबाईल चोरीच्या आरोपीचा शोध घेण्यात नंदुरबार शहर पोलीसांना आले यश

गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाच्या आत मोबाईल चोरीच्या आरोपीचा शोध घेण्यात नंदुरबार शहर पोलीसांना आले यश

नंदुरबार/फहिम शेख

दिनांक ०५/०३/२०२२ रोजी रात्री ११.०० वा. ते दि. ०६/०३/२०२२ रोजीचे पहाटे ०६.०० वा. चे दरम्यान यातील फिर्यादी द्वारकादास उरनसिंग पटेल, वय ४५ वर्ष, धंदा व्यापार, रा. शंकर अपार्टमेंट सोमश्वरनगर, सुरत (गुजरात) ह.मु. विरल विहार प्लॉट न. २३, नंदुरबार याचे राजकुमार पाटील यांचे दवाखान्या शेजारी घर बांधकामाचे काम चालु असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे बांधकामाचे साइट वरुन १) १०,०००/- विवो कंपनीचा ४-३३ S काळया रंगाचा त्याचा IMEI क्रमांक ८६८३८६०५४०९७०५४ जु.वा. २) १०,०००/- टेक्नो कंपनीचा लाईट ग्रीन त्याचा IMEI क्रमांक ३५४६१७७८४३७०५०७ जुवा असे फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरुन नेले म्हणुन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला फिर्यादीच्या तक्रारीवरुन दि. ०६/०३/२०२२ रोजी भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर मा. पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी • सचिन हीरे सो. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर सो व गुन्हे शोध पथकाने तपासाचे चक्र फिरवुन सदरचे मोबाईल हे धडगाव येथील जितेंद्र सायसिंग पावरा याने चोरल्याचे समजल्याने सदर आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधी विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदरचा गुन्हा २४ तासाच्या आत उघडकीस आणुन आरोपी जितेंद्र सायसिंग पावरा, वय २१ वर्ष, रा. धडगाव याचेकडुन ०२ मोबाईल जप्त करण्यात आले असुन आरोपीस सदर गुन्हयात अटक केली आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हीरे सो यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर सो. पोउपनि/मुकेश पवार, पोहेकॉ/ अतुल बिहऱ्हाडे, पोना/बलविंद्र ईशी, पोकॉ/ विजय नागोडे, पोकॉ/ राहुल पांढारकर, पोकों/इम्राण खाटीक यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button