Sangali

?दंगल राजकाणाची..खा. संजय पाटील समर्थकांचे आऊट गोईंग सुरूच; मोठा गट करणार राष्ट्रवादीत प्रवेश

खा. संजय पाटील समर्थकांचे आऊट गोईंग सुरूच; मोठा गट करणार राष्ट्रवादीत प्रवेश

तासगाव : तासगाव तालुक्यातील खासदार संजय पाटील समर्थकांचे आऊटगोईंग थांबायला तयार नाही. एक-एक करुन कार्यकर्ते खासदार संजय पाटील यांना सोडून चालले आहेत. शनिवारी तीन कट्टर समर्थकांनी मुंबईत शिवबंधन बांधले. प्रवेशाचा हा कार्यक्रम होऊन २४ तासही उलटले नाहीत तोपर्यंत तासगाव पूर्व भागातही खासदार गटाला मोठे खिंडार पडले आहे.
तासगाव तालुक्यात खा. संजय पाटील गटाला गळती कट्टर समर्थकांची भाजपला सोडचिट्टी
रविवारी सावळज (ता. तासगाव) येथील खासदार समर्थक माजी सरपंच हेमंत पाटील आणि माजी उपसरपंच अनिल थोरात यांच्यासह मोठा गट अंजनी येथे आमदार सुमन पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
सावळज ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २०१५ च्या निवडणूकीत खासदार पाटील यांनी आमदार सुमन पाटील यांच्याकडून सत्ता काढून घेतली होती. आता या निवडणुकीत खासदार संजय पाटील व आमदार सुमन पाटील गट एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत.
ही निवडणूक काट्याची होण्याची चिन्हे दिसत आहेत. या परिस्थितीत समर्थक बाहेर पडू लागल्याने खासदार संजय पाटील यांची चिंता वाढू लागली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button