Nashik

मोहाडी श्रीकृष्ण व्याख्यानमाला यावर्षी ऑनलाईन २३ऑगस्ट पासून सुरवात

मोहाडी श्रीकृष्ण व्याख्यानमाला यावर्षी ऑनलाईन २३ऑगस्ट पासून सुरवात

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : मोहाडी ता. दिंडोरी येथे गेल्या 65 वर्षापासून ग्रामदैवत मोहाडमल्ल व श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दरवर्षी अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात रक्षाबंधन ते श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्यंत दरवर्षी नित्यनेमाने व्याख्यानमालेचे आयोजन केले जात होते. या व्याख्यानमालेत पांडुरंगशास्त्री आठवले, आचार्य अत्रे, बाळासाहेब भारदे, दाजी पनशीकर, विद्याधर गोखले, उत्तमराव कांबळे यांसारख्या वक्त्यांनी उपस्थिती दिली आहे.परंतु ही परंपरा मागील वर्षी कोरोना या जागतिक आपत्तीमुळे खंडित झाली. याहीवर्षी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासनाच्या आदेशाप्रमाणे आयोजन न करण्याचे संयोजन समितीने ठरवले होते. परंतु अनेक ग्रामस्थांनी व्याख्यानमालेची परंपरा खंडीत होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर उपाय म्हणून संयोजन समितीने ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्याचे ठरवले. त्या प्रमाणे दिनांक २३ ऑगस्ट ते २९ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने सायंकाळी सहा ते आठ या वेळेत
ऑनलाईन- झूम ऍप, यु ट्यूब लिंक आणि फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आयोजित केली आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन
(दि.२३)आदर्श गाव हिवरेबाजार चे सरपंच पोपटराव पवार यांचे (आदर्श गाव निर्मितीत लोकसहभागाचे महत्व),
(दि. २४व२५) रामचंद्र देखणे -पुणे (महाराष्ट्रातील संत परंपरा) तर दुसऱ्या दिवशी(महाराष्ट्रातील लोक परंपरा आणि लोक प्रबोधन),
(दि.२६ व २७) राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे- पुणे यांचे दोन्ही दिवस (गौरवशाली भारताचा इतिहास आणि वर्तमान) ,
(दि.२८व२९)विवेक घळसासी-नागपूर( सकारात्मकते ची लस) तर दुस-या दिवशी (छत्रपती शिवराय काळाच्या पुढचे नेतृत्व)या विषयाने व्याख्यानमालेचा समारोप होईल.
ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसणाऱ्या व ज्येष्ठ नागरिकांनाही या व्याख्यानांचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली असून त्यावेळी कोव्हिड संदर्भातील सर्व शासन नियमांचे पालन करण्यात येणार आहे .तरी सर्वांनी या ऑनलाईन व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव जाधव व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव प्रतिष्ठानचे व व्याख्यानमाला आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ.विलास देशमुख, सचिव प्रविण नाना जाधव, सदस्य संजय डिंगोरे, प्रा धनंजय देशमुख, धनंजय वानले, अजिंक्य सोमवंशी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button