Pandharpur

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मनसे आंदोलन व काळा दसरा आंदोलन केला साजरा : दिलीप बापू धोत्रे

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मनसे आंदोलन व काळा दसरा आंदोलन केला साजरा : दिलीप बापू धोत्रे

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पुणे येथील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मनसे च्यावतीने आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन काळा दसरा आंदोलन म्हणून करण्यात आले.यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले,सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी या मागणीसाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले.
यावेळी रावणरुपी आघाडी सरकारचे दहन करण्यात आले.यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, मनसे नेते बाबू वागस्कर, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष रुपालिताई पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड, रवींद्र गारूडकर,जिल्हा अध्यक्ष समीर थीगळे,जिल्हा अध्यक्ष विनोद जावळे इत्यादी उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button