Washim

वाशिम जिल्ह्यातील खेर्डा येथे बिरसा क्रांती दलाच्या वतीने महिला बैठक

वाशिम जिल्ह्यातील खेर्डा येथे बिरसा क्रांती दलाच्या वतीने महिला बैठक

प्रतिनिधी दिलीप आंबवणे

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात खेर्डा नावाचे गांव. या गावात सर्व महिलांनी एकत्रित येत बिरसा क्रांती दल वुमेन्स फोरम स्थापन करण्याचे ब-याच दिवसापासून ठरविले.
आज दि.१९ जानेवारीला राज्याचे महासचिव मा.प्रमोद घोडाम यांचे मार्गदर्शनात वुमेन्स फोरम यवतमाळ जिल्हाध्यक्षा मा.सिमाताई मंगाम यांचे अध्यक्षतेखाली, मिनाक्षी कन्नाके , वाशिम जिल्हाध्यक्ष राजेश मस्के ,माजी पं.स.सदस्य कारंजा अरुण मरसकोल्हे , कविता मडावी वुमेन्स फोरम तालुकाध्यक्ष कारंजा, यांचे प्रमुख उपस्थितीत आज महीला मेळावा घेण्यात आला.
याप्रसंगी बिरसा क्रांती दल वुमेन्स फोरम खेर्डा शाखा गठीत करण्यात आली.

यावळी प्रमोद घोडाम यांनी आदिवासी समाजाच्या विविध समस्यावर सखोल मार्गदर्शन केले.सिमाताई मंगाम यांनी आदिवासी महिलांना भेडसावणाऱ्या समस्या यावर सविस्तर मार्गदर्शन केले. राजेश मस्के यांनी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी बिरसा क्रांती दल कसे काम करीत आहे.याची माहिती दिली.

Leave a Reply

Back to top button