Maharashtra

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परंडा च्या वतीने गरजुंसाठी अन्नधान्याच्या किटचे वाटप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परंडा च्या वतीने गरजुंसाठी अन्नधान्याच्या किटचे वाटप

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

कोरोना विषाणू मुळे अनेक गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, यानिमित्ताने अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत भारत देशांमध्ये लॉकडाऊन असल्याने नागरिकांना बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. यानिमित्ताने परंडा मधील जे नागरिक रोज मोलमजुरी करतात व ज्याचे पोट हातावर असणार्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह करु शकत नाही अशा गरजू नागरिकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज दिनांक ७ एप्रिल रोजी कुंभेजा गावातील १० कुटुंबे, सोनारी येथील ४ कुटुंबे , परंडा येथील ३ कुटुंबे व ढगपिंपरी फाट्यावर अडकलेल्या ५ नेपाळी बांधवांना व राजस्थानी मजुरांना जिवनावश्यक वस्तु, किटचे वाटप,किराणा साहित्य व गहू तांदळाचे वाटप करण्यात आले.

परंडा तालुकातील करंजा येथील छोटयाश्या गावात राहणारे लक्षण गोरे .परंडा तालुक्यातील करंजा हे एक छोटेशे ग्रुप ग्रापंचायत खेडेगाव पण समाजकार्याचा वसा उचलणारे लक्षण गोरे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परंडा या संघातुन त्यांनी आपले समाजकार्य चालु केले व गेली कित्येक वर्षे ते समाजकार्य करत आहेत दिवस असो वा रात्र काही कुनाला अडचण निर्माण झाली तर लगेच तात्काळ हजर होतात हाकेला धावत येण हीच तर त्यांची ओळख आहे.कोरोणा विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नी लॉक डाऊन चा निर्णय घेतला व या लॉक डाऊन दरम्यान तालुक्यात कोनावर देखील उपासमारीची वेळ येणार नाही व कोणीही उपाशी राहणार नाही याची लक्ष्मण गोरे हे जातीने काळजी घेत आहेत. या कार्याचे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह लक्ष्मण गोरे, सहकार्यवाह सारंग खंडागळे, शहर कार्यवाह उमेश पालके व विशाल काशीद उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button